भारनियमनाविरोधात शिवसेनेचा पाळधी महामार्गावर रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:18 PM2018-10-10T23:18:44+5:302018-10-10T23:21:10+5:30
भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बुधवारी दुपारी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान पाळधी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
धरणगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातुन पाठ फिरवताच वीजेच्या भारनियमनाला सुरुवात झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, युवकांची अडचण झाली आहे. भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बुधवारी दुपारी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान पाळधी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महावितरण व प्रशासनाने आंदोलनस्थळी येऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
वीज महावितरण कंपनीने जिल्ह्यात भारनियमन सुरु केले आहे. सकाळ, दुपार, रात्री अशा तीन टप्प्यात वीज गायब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याविरोधात संतप्त शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांसह पाळधी फाटा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे व सचिन पवार, तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. सुमारे दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे धुळे व जळगावच्या दिशेने दोन्ही बाजुला ३ कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.
आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, कवठळ सरपंच नितिन कोळी, विभाग प्रमुख गोकुळ लंके, शेरी सरपंच कुमावत , पाळधी सरपंच प्रकाश पाटील ,राजाराम कोळी, दीपक सावळे ,अनिल कासट, धर्मेन्द्र कुंभार ,संजय पांडे, हाजी सुलतान पठान, हाजी अहमद शेख, सादिक देशमुख, दानिश पठान, युवा सेना शहर प्रमुख मनोज माळी, पप्पू माळी, पिंटू कोळी, किशोर सोनवणे, दिनेश कडोसे, बलराम कोळी, चंदू इंगळे उपस्थित होते.