वावडदा येथील रसवंती पुन्हा जोमाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:03+5:302021-03-06T04:16:03+5:30
शिरसोली येथून आठ किमी अंतरावर असणाऱे वावडदा गाव एरंडोल-नेरी व जळगांव- पाचोरा या चौफुलीवर वसले आहे. हे ...
शिरसोली येथून आठ किमी अंतरावर असणाऱे वावडदा गाव एरंडोल-नेरी व जळगांव- पाचोरा या चौफुलीवर वसले आहे. हे गांव चौफुलीवर असल्याने येथे बरेच लोक उन्हाळ्यात गोड व थंड गार रसवंतीचा व्यवसाय करीत असतात. मागील वर्षी उन्हाळ्याचा सिझन सुरू होताच कोविडचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लागल्याने रसवंती चालकांना आपल्या रसवंती बंद ठेवाव्या लागल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. परंतु यंदा पुन्हा येथील रसवंती जोमाने सुरू झाल्या आहेत. वावडदा चौफुलीवर जवळपास बारा ते पंधरा रसवंतीची दुकाने आहेत. येथील रसवंती चालक हे स्वतःच्या शेतात पिकवलेल्या उसाचाच वापर करीत असतात. हा ऊस नरम, गोड व स्वादिष्ट असल्याने रसवंती चालकांकडून लागवडीसाठी याच उसाची निवड केली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात येणारे जाणारे प्रवासी येथील रस पिण्यासाठी मुद्दामहून थांबतात.