स्वयंशिस्तीचे उपासक रतनलाल बाफना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:34+5:302021-02-11T04:18:34+5:30
फोटो - ११ बाफनाजी जळगाव : वेळ, काळ ओळखून स्वयंशिस्तीला महत्त्व देणे म्हणजे आदर्शाची मुहूर्तमेढ रोवणे होय. याच ...
फोटो - ११ बाफनाजी
जळगाव : वेळ, काळ ओळखून स्वयंशिस्तीला महत्त्व देणे म्हणजे आदर्शाची मुहूर्तमेढ रोवणे होय. याच आदर्शातून आपण कुठलेही कार्य करत राहिले तर,त्यात यशाची विश्वसनीय वाट लाभणार हे त्रिकालबाधीत सत्य आहे. याच गोष्टीचा अंगीकार करून स्वयंशितीची नीव टाकणारे स्व. रतनलाल बाफना होय. आपल्या जीवनात त्यांनी सहकारी, मित्र परिवार, कुटुंब ह्या साऱ्यांमध्ये आपल्या शिस्तप्रिय व्यक्तीमत्वाची अमिट छाप येणाऱ्या साऱ्या पिढ्यांसमोर सोडली आहे.
रतनलाल बाफना यांच्या स्वयंशिस्तीचे अनेक उदाहरण सांगता येतील. त्यांची एकदा काही मिनिटांसाठी फ्लाईट मिस झाल्याचे मोल त्यांनी मनी बाळगून ठरवले की कोठेही जातांना वेळेच महत्त्व पाळणे आवश्यक असून ते अंगीकारले पाहिजे. ते गोशाळेत नित्य सकाळी पाच वाजता जायचे. एकदा ते रोजच्याप्रमाणे तयार झाले पण चालक दिलेल्या वेळी पोहचला नाही. अखेर ते गोशाळेच्या दिशेने पायी चालत निघाले. मागून ड्रायव्हर उशिराने त्यांच्याजवळ गाडी घेऊन पोहचला, तोवर त्यांनी दोन किमी अंतर पार केले होते. पण त्यावर ते रागावले नाहीत. पण त्यानंतर पुढे कुठेही जायचे असले तर ड्रायव्हरसुद्धा वेळेवर पोहोचायला शिकला. आपला व्यवसाय असो वा सामाजिक कार्याचा पट,यात ज्याही सहकाऱ्यांसोबत ते वावरत, त्यांना आपल्या कुटुंबाचा सदस्य रूपानेच वागवत. मालक सहकारी नातं दृढ करताना प्रत्येकाच्या सुख-दु:खात सामील झालेत. त्यांचे सर्वात मोठेपण म्हणजे कुठलीही चूक एकदा पदरात घेवून त्याबदल्यात त्या चुकीतून सुधारण्याची संधी ते प्रत्येकाला देत. आपल्या दैनंदिनीत ते कामांची रोजनीशी लिहिताना झालेल्या कामाचा आढावा घेत व राहिलेल्या कामांना प्राधान्य देत नियोजन सूत्रबद्धतेने करत. आपल्या सुवर्ण व्यवसायाच्या दालनातील सकाळची प्रार्थना त्यांची कधीही चुकविली नाही. यासाठी ते सहकाऱ्यांना नित्य मार्गदर्शन करत असत. आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीतील आधारवड हे स्व. भाईसाहेब होते. आपल्या सोबतीच्या गोतावळ्यात त्यांच्या धर्मपत्नी नयनतारा बाफना, कस्तुरचंद बाफना, सुशीलकुमार बाफना, सज्जनराज बाफना, सुरेशचंद्र बाफना, सुनील बाफना, राजकुमार बाफना राहुल बाफना,सिद्धार्थ बाफना यांच्यासह कुटुंबातील सुना, नातवंडे असा आपला स्नेहाचा गोतावळा जपत होते. आज रतनलाल बाफना यांच्या ८६ व्या जन्म जयंतीनिमित्त त्यांना सुमनांजली अर्पण करतो, त्रिवार अभिवादन करतो.
- मनोहर पाटील (पीआरओ)