खासगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:37+5:302021-05-13T04:16:37+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खासगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन ...

The rates of ambulances used for private work are fixed | खासगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित

खासगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खासगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.

व्हॅनसारख्या वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर

.

जीपसदृश बांधणी केलेली वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा ४०७ या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

आयसीयु (कार्डीओ व्हॅन) (वातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

या दरानुसार आकारणी केली जात नसेल तर रुग्णाच्या नातेवाईकांनी आरटीओशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The rates of ambulances used for private work are fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.