पिंपळगाव हरेश्वर येथे सोमवारी रथोत्सव
By Admin | Published: April 8, 2017 12:34 PM2017-04-08T12:34:57+5:302017-04-08T12:34:57+5:30
300 वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून 10 रोजी हा रथोत्सव साजरा होणार आहे.
पिंपळगाव हरेश्वर, जि. जळगाव, दि. 8- 300 वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून 10 रोजी हा रथोत्सव साजरा होणार आहे.
श्रीसमर्थ गोविंद महाराज यांनी 1795मध्ये पिंपळगाव येथे या
रथोत्सवाची सुरुवात केली. आजही ही परंपरा कायम असून विठ्ठलमंदिरापासून रथोत्सवास प्रारंभ होतो. त्यासाठी आदल्या दिवसापासून रथ सजविण्याचे काम सुरू होते. रथाचे समोरील बाजूस दोन पांढरेशुभ्र लाकडी अश्वे असतात आणि सारथी म्हणून अजुर्नाची मूर्ती असते. रथामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात.
गोविंद महाराजांचे सातवे वंशज ह. भ. प. शिवानंद महाराज व अंजलीबाई देवदेवतांची पूजा व आरती करतात त्यानंतर महाराज व ग्रामस्थ गावातील मुख्य रस्त्याने रथ ओढतात. रथाला मोगरी लावण्याचे काम भागवत गिते तर रथाची साफसफाई व अबदेगिरी गोविंदसिंग सरदारसिंग व परिवार करीत असतो. आरती व प्रसाद करण्याची जबाबदारी मनोज साखरे यांच्यावर असते आणि सुरेश कोळी, पंडित बोढरे हेदेखील विविध जबाबदारी संभाळतात. रथ विठ्ठलमंदिराजवळ आल्यानंतर रेवडय़ांचा प्रसाद उधळला जातो. पूजा आरतीकरून कार्यक्रमाची सांगता होते.