केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे रेशन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:14+5:302021-04-30T04:21:14+5:30

जळगाव : नेरी नाका भागातील पांचाळ वस्ती येथे केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी ३० गरजू कुटुंबांना शिधावाटप करण्यात आला. ...

Ration distribution by Keshavsmriti Pratishthan | केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे रेशन वाटप

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे रेशन वाटप

Next

जळगाव : नेरी नाका भागातील पांचाळ वस्ती येथे केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी ३० गरजू कुटुंबांना शिधावाटप करण्यात आला.

आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी केलेल्या सर्वेक्षणच्या माध्यमातून नेरी नाका येथील पांचाळ वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान उत्पन्नाचे कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक उपासमार होत असल्याचे समोर आले होते. अशा कुटुंबांना मदत करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, चनाडाळ, तुरडाळ, तेल, आटा, साखर, चहा पावडर, मीठ, हळद, मिरची पावडर अशा वस्तू पुढील महिनाभरासाठी देण्यात आल्या. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे संचालक विवेक पलोड यांचे सहकार्यातून शिधावाटप करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा पलोड, भानुदास येवलेकर, सागर येवले, कुणाल शुक्ला, हर्षल दुसाने उपस्थित होते.

Web Title: Ration distribution by Keshavsmriti Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.