आर्थिक संकट काळात जामनेरला रेशन किट सहाय्यकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:11 AM2021-07-04T04:11:54+5:302021-07-04T04:11:54+5:30
जामनेर : कोरोना संकट काळात आर्थिक अडचणीच्यावेळी गोरगरिबांना सहाय्यकारी ठरलेल्या कमल मोहन रेशन किट योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला शनिवारी सकाळी ...
जामनेर : कोरोना संकट काळात आर्थिक अडचणीच्यावेळी गोरगरिबांना सहाय्यकारी ठरलेल्या कमल मोहन रेशन किट योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला शनिवारी सकाळी शहरातील सुमारे साडेतीनशे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते विनोद लोढा यांच्या गेंदाबाई मोहनलाल लोढा प्रतिष्ठानकडून ११ महिन्यांपासून गरीब व गरजूंना या योजनेतून वाटप केले जाते. मुंबई येथील पोतदार मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश ताथेड, शोभा ताथेड, माजी नगरसेवक अनिल बोहरा, जैन श्री संघाचे डॉ. के. एम. जैन, वंदना लोढा व बाळू डांगी यांच्याहस्ते वाटप झाले. गोपाळ देशपांडे, विकास चौधरी, रतन राणा, दीपक देशमुख, जितू पालवे यांनी स्वागत केले.
विनोद लोढा यांनी प्रतिष्ठानच्या योजनांची माहिती प्रास्ताविकातून दिली. अबूलाला शेख, शरीफ पिंजारी, डाॅ. मनोज विसपुते, वसिम शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुधीर साठे यांनी केले तर आभार विनोद लोढा यांनी मानले.