रेशन दुकानदारांचे तहसीलदारांना साकडे
By admin | Published: July 7, 2017 12:17 PM2017-07-07T12:17:44+5:302017-07-07T12:17:44+5:30
पीओएस मशीनमध्ये तांत्रिक समस्या : जामनेर तालुक्यात निम्म्याहून अधिक गावांमध्ये अडचणी
Next
ऑनलाईन लोकमत
जामनेर ,दि.7 - तालुक्यातील सर्वच 170 स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाने पीओएस मशीन वाटप केले असले तरी ग्रामीण भागातील सुमारे 50 टक्के गावातील धान्य दुकानदार तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संघटनेच्या पदाधिका:यांनी गुरुवारी तहसीलदारांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
शिधापत्रिकांचे आधार कार्डशी लिंकिंगचे काम सुरू असून अजूनही सुमारे 40 टक्के आधार कार्ड शिधापत्रिकेशी जोडले गेलेले नाहीत. आधार जोडणी झालेल्या शिधापत्रिकाधारकांना पीओएस मशीनद्वारे धान्य वितरण केले जावे असे शासनाचे आदेश आहेत. येथील पुरवठा विभागाने सर्वच धान्य दुकानदारांना पीओएस मशीन वाटप केले असून याद्वारे धान्य वितरण करावे असे सुचविले आहे. असे असले तरी तालुक्यातील 50 टक्के भागात तांत्रिक अडचणींमुळे पीओएस मशीन शोपीस ठरत आहे. ही तांत्रिक अडचण धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तेजराव ठोंबरे व पदाधिका:यांनी तहसीलदार नामदेव टिळेकर यांना सांगितली. या दुकानदारांची अडचण सोडविण्यात येईल, असे तहसीलदारांनी त्यांना आश्वासन दिले.