रत्नापिंप्री येथे विद्याथ्र्यानी केली 40 हजाराची मंगलपोत परत
By admin | Published: April 18, 2017 12:44 PM2017-04-18T12:44:11+5:302017-04-18T12:44:11+5:30
शालेय विद्याथ्र्यानी सापडलेली 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत परत करून, प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला.
Next
र}ापिंप्री,ता.पारोळा,दि.18- गरीबी पेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची असते. लोभाला बळी न पडता, येथील घरची हालाखीची परिस्थिती असलेल्या दोन शालेय विद्याथ्र्यानी सापडलेली 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत परत करून, प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्या दोघांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
र}ापिंप्री येथे 17 एप्रिल रोजी शामकांत पाटील यांच्या लगA सोहळ्याचा कार्यक्रम होता. लगAाच्या आदल्यादिवशी हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री व:हाडी मंडळी नाचण्यात मगA होती. नवरदेवाची बहीण अर्चना पाटील यांची चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत तुटून पडली. रात्री उशिरा र्पयत कोणाला काहीच समजले नाही. मात्र सोन्याची मंगलपोत हरविल्याचे समजताच, आनंदावर विरजण पडत, रात्री उशिरार्पयत शोधाशोध सुरू झाली. मात्र मंगलपोत काही सापडली नाही. दरम्यान या लगAसोहळ्याच्या ठिकाणी र}ापिंप्री येथील श्री.यशवंत माध्यमिक विद्यालयाचे विशाल गोरख गायकवाड (6वी) व अनिल अशोक कसबे (7 वी) हे देखील आले होते. त्यांना मंगलपोत सापडली. त्यांनी ती घरी नेली. ही गोष्ट विशालने आपली आजी इंदूबाई गायकवाड यांना तर अनिलने आई कमलबाई कसबे यांना सांगितली. त्यांनी याची सखोल माहिती दोघांकडून घेतली. इंदूबाई व कमलाबाईसह दोघ मुल विवाह सोहळा असलेल्यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी अर्चना पाटील यांची सापडलेली मंगलपोत त्यांना परत केली. (वार्ताहर)