भडगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी रावण भिल्ल बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 16:34 IST2021-08-13T16:34:33+5:302021-08-13T16:34:59+5:30
रावल भिल्ल यांची बिनविरोध निवड झाल्यावर जल्लोष करण्यात आला.

भडगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी रावण भिल्ल बिनविरोध
अशोक परदेशी
भडगाव : येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेचे वाडे गणाचे सदस्य रावण श्रीपत भिल्ल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार सागर ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली, विशेष सभेत ही निवड घोषित करण्यात आली. निवड होताच उपस्थित पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी नूतन उपसभापती रावण भिल्ल यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी फटाके फोडून ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.
रावण भिल्ल यांचा सत्कार सुरुवातीला आमदार किशोर पाटील यांनी केला. या निवडीवेळी भाजपच्या पंचायत समिती सभापती डॉ. अर्चना पाटील, शिवसेनेच्या सदस्या हेमलता पाटील, रामकृष्ण पाटील, रावण भिल्ल हे चार सदस्य उपस्थित होते.
भाजपच्या सदस्या अलकाबाई पाटील या गैरहजर होत्या. या निवडीत ३ शिवसेना, १ भाजप असे संख्याबळ आहे. पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत आहे. यापूर्वीच आमदार किशोर पाटील यांनी ठरविल्यानुसार ही उपसभापती पदाची संधी रावण भिल्ल यांना मिळाली आहे.
पंचायत समितीचे उपसभापती प्रताप सोनवणे यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. या रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, पंचायत समिती सभापती डॉ. अर्चना पाटील, सदस्य रामकृष्ण पाटील, सदस्या हेमलता पाटील, जि. प.चे माजी सदस्य विकास पाटील, संजय पाटील, जालिंदर चित्ते, बाजार समिती संचालक युवराज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. विलास पाटील, डॉ. विशाल पाटील, माजी उपसभापती राजेंद्र परदेशी, सरदार परदेशी, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रतन परदेशी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप शेंडे, विनोद परदेशी, प्रकाश परदेशी, भिकन परदेशी, नारायण परदेशी, भानुदास देवरे, विजय पाटील, मळगाव सरपंच गुलाब पाटील, प्रताप परदेशी, ज्ञानेश्वर पाटील,दिपक पाटील, सचीन परदेशी, अशोक परदेशी, सुभाष मोरे, संतोष देवरे, गौतम मोरे, कैलास परदेशी, दिलीप परदेशी, विठ्ठल सोनवणे, कार्यालयीन प्रमुख दिलीप चिंचोरे यांच्यासह बांबरुड, वाडे, मळगाव, लोणपिराचे, कजगाव आदी गावातील नागरिक हजर होते.
बांबरुड प्र. ब. गावात पुन्हा उपसभापती पद मिळाल्याने व वाडे पंचायत समिती गणाला उपसभापती पदाची पुन्हा संधी मिळाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डॉ. विशाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन उपसभापती रावण भिल्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले.