दानवांच्या देव्हा:यात असतोय असाही रावण देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:01 AM2017-11-22T02:01:41+5:302017-11-22T02:02:23+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हासु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा लेख दानवांच्या देव्हा:यात रावण देव
नानाचा ‘मामा ’करण्याच्या हेतूने बहुधा कोणी तरी त्याच्या डोक्यात हवा भरली आणि ती डोक्यातली हवा छातीत भरून छाती फुगवून घेत तो मला म्हणाला, ‘नीट बघ, उद्याचा सिंगिंग, डांसिंग कॉम्पिटीशनचा रियालिटी सुपरस्टार विनर तुङयासमोर उभा आहे.’ नानाने गायचं, नाचायचं ठरवणं म्हणजे ‘म्हाडा’ने ताजमहाल बांधून दाखवतो, म्हणण्यासारखं होतं. पण नानापुढे ‘गीता’ वाचण्यात काही अर्थ नव्हता. तो म्हणाला, ‘मी जय्यत तयारी केली आहे. तिथे स्पर्धा जिंकण्यासाठी गाता, नाचता येणं महत्त्वाचं नाही. माझा पोशाख, माझं दिसणं महत्त्वाचं आहे. शिवाय- माझीया गीतास पोशाखी नवा आधार आहे, माझीया नृत्यास स्पर्धेच्या कथेची धार आहे. दावितो माझी कलाकारी मतांसाठीच आता, आणि माङो मागणे ‘एसेमेस’ही अनिवार्य आहे. मी दिसायालाही हिरो, मी महागायक उद्याचा, कानसेनांच्या मतांचा येथ ना बडिवार आहे. मी म्हटलं, ‘नाना तू स्टेजवर एकटा नाचताना विचित्र दिसशील रे’ यावर तो झटक्यात म्हणाला- एकटा नाचे कुठे मी ? एकटा गातो कधी मी? हातवारे फेकणारे, भोवती चिक्कार आहे. स्पर्धकाला खास मिळते घट्ट मिठी सुंदरींची, हे बरे आहे, तसा मी, एरवी भंगार आहे. मी काही म्हणणार तोच तो म्हणाला, ‘डोळ्यात पाणी आणून मी ‘जजेस’समोर असं नाटक करेन, की दगडच काय पण तुलासुद्धा पाझर फुटेल.’ नाटकी ही विनयखोरी, वाढवी आशा उद्याची, खूष होता जज्ज सारे, मीच सुपरस्टार आहे. गीतही साधेसुधे, कोटय़वधींनी गायिलेले, ‘वेगळे’ ‘हटके’ म्हणोनी, तेच मी गाणार आहे. निर्णयासाठी जनांचा कौलही ते मागविती, आर्त माङया याचनांचा नाटकी निर्धार आहे. मी काकुळतीने म्हणालो, अरे नाना, तिथे, तालासुराचं तरी भान ठेवावं लागेल रे.’ यावर तो छद्मीपणे म्हणाला,- पातलो मी साथकत्र्या तबलजीचा सूड घेण्या, घेत सांभाळून मजला, तो तिथे रडणार आहे. मी भीत भीत सुचवलं, ‘रियॉलिटी शो’ जिंकायला स्वभावात ज्या ‘क्वालिटीज’ लागतात त्या तुङयात नाहीत रे.’ मला वाटलं, नाना भडकेल. पण तो क्षणात नखशिखांत बदलला. त्याचं जणू गरीब गायीत रूपांतर झालं. त्याच्या चेह:यावरून विनयशीलता धो-धो वाहू लागली. विनयाची परमोच्च अभिव्यक्ती सादर करत तो म्हणाला, ‘थँक्यू, थॅंक्यूचा जप करण्याची, ‘जजेस’च्या वाक्या-वाक्याला जमिनीवर डोके टेकवून नतमस्तक होण्याची, मी खूप प्रॅक्टीस केली आहे. शिवाय घरोघरी टीव्हीसमोर बसून मला पाहणा:या, ऐकणा:या तज्ज्ञांनी शिव्या जरी घातल्या, तरी वाहिन्यांच्या ‘अर्थकारणावर’ माझा विश्वास आहे. जिंकण्याची मी जय्यत तयारी केली आहे. सज्ज असती पलटणी गुण जोखण्या येथे परंतु, वाहिन्यांचे अर्थकारण, हा मला आधार आहे. मी म्हटलं, ‘होशील बाबा, तू सुपरस्टार होशील. कारण म्हटलंच आहे, की ‘दानवांच्या देव्हा:यात रावण देव !’