रावेर येथील घरफोडीतील आरोपींची काढली धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 09:48 PM2020-01-23T21:48:19+5:302020-01-23T21:48:24+5:30
दोघे जण होते फरार : पोलीस कोठडीत रवानगी
केºहाळे, ता. रावेर : रावेर येथील जीआयएस कॉलनीतील रहिवासी मयूर प्रकाश महाजन यांच्या कडील घरफोडीतील दोन्ही अरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी रावेर शहरातून धिंड काढली.
या घरफोडीतील संशयित सेवलसिंग उर्फ सिंधू मांगीलाल बारेला याआरोपीला फियार्दीच्या घराजवळ ३१ रोजीच अटक करण्यात आली होती . मात्र याच घटनेतील दोन संशयित फरार आरोपींना अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. रामा उर्फ रामू रमेश बारेला (वय २५ रा. कोठा बुजुंग, जि. खरगोन), दलसिंग उर्फ चिम्या मांगीलाल बारेला (वय २२) रा.आंबेखेडा जमाफल्या जि. खरगोन) या दोघांना २२ दिवसानंतर अटक केली. आरोपींना प्रथम वर्ग न्यायाधीश राठोड यांचे समोर हजर केले असता एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. त्यांच्या अटकमुळे बरेच घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींना पकडण्यासाठी पो.नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय ललितकुमार नाईक, एएसआय इस्माईल शेख यांनी हे. कॉ. दशरथ राणे, जमील शेख, गुलाब सैदाने, पो. कॉ. भरत सोपे, सुरेश मेढे, उमेश नरवाडे, मनोज मस्के, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
सदर गुन्ह्यातील आरोपींना पो.नि. वाकोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पायी फिरुन घारफोडी संदर्भात असलेली नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरोपींची पायी धिंड काढून एक नवीन पायंडा रचला आहे. या कामगिरीमूळे रावेर शहरात पोलीसांविषयी कौतुक होत आहे.