रावेर होतेय श्री गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:42 PM2018-09-12T15:42:15+5:302018-09-12T15:43:06+5:30
रावेर : सुरत, औरंगाबाद, जालना, एरंडोल व बºहाणपूरला होतेय तब्बल २१ फुट उंचीच्या मूर्तीची निर्यात
रावेर, जि.जळगाव : खान्देश, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील गणेशभक्तांसाठी रावेर येथील मोरे प्रतिष्ठानने मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. बºहाणपूर येथून भव्य, उंच व सुबक अशा विघ्नहर्त्याच्या मूर्ती आणण्याऐवजी आता थेट रावेर येथून मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, विदर्भ व मराठवाड्यात ‘श्री’च्या मूर्र्ती निर्यात होऊ लागल्याने श्री गणेशभक्तांसाठी रावेरची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
तिसऱ्या पिढीच्या पूर्वजांनी अमरावतीहून बºहाणपूरच्या उद्योग नगरीत स्थलांतर करून श्री विघ्नहर्ता व आदीशक्तीच्या विविध रूपकांच्या मूर्तीकलेचा व्यवसाय थाटला होता. बाबूराव मोरे यांनी मूर्तीकलेचे लावलेले रोपट्याचा मूर्तिकार राजेश मोरे यांनी आधुनिकतेची कास धरून जे.जे.कॉलेज आॅफ आर्ट्समध्ये कलाशिक्षणाचे धडे घेतलेल्या त्यांच्या थोरल्या भावाकडून अंगी अभिजात असलेल्या मूर्तिकलेला नवा आयाम दिला आहे. लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अष्टविनायक, दशावतारी श्रीगणेश, रथावर आरूढ श्रीगणेश, श्री शिवावतारातील, श्रीकृष्ण रूपातील, श्री दत्तावतारातील श्रीगणेश मूर्ती, अशा विविध कलाकुसरातील गणेशभक्तांच्या मनाला भावणारे श्री गणेश व दुर्गा रूपकांच्या मूर्र्तींनी खान्देश, विदर्भ, मराठवाडा, गुजरात व मध्य प्रदेशात मोरे प्रतिष्ठानच्या कलाविष्काराने श्रीगणेशभक्तांवर एकच मोहिनी घातली आहे.
त्यांचे सुपुत्र सुनील मोरे, अक्षय मोरे यांनी त्यांचे आजोबांनी रावेरशी नमकीन चिवड्याच्या विक्री व्यवसायातून जोडलेल्या ऋणानुबंधांना उजाडा देत मोरे प्रतिष्ठानचे स्वस्तिक चित्रपटगृहाच्या कलामंदिरातच मूर्तिकलेची पूजा करीत मूर्ती व्यवसायाचे दालन खुले केले आहे. या माध्यमातून शहरात मूर्ती व्यवसायाची बाजारपेठ श्री गणेश व दुर्गा भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्याचे चित्र आहे. आजोबांपासून वडिलांपर्यंत सुरू असलेल्या अभिजात मूर्तिकलेला इंटरनेट व सोशियल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन कलाकुसरीची जोड देत रावेर शहराला मूर्ती व्यवसायाची बाजारपेठ म्हणून अशी नवी ओळख रावेरच्या शिरपेचात त्यांच्या माध्यमातून रोवली गेली आहे.
यंदा किमान आठ ते कमाल २१ फुट उंचीच्या मनमोहक व भाविकांच्या श्रध्देला मनमुराद साद घालणाºया विविध रूपातील नावीन्यपूर्ण कलाकुसर व रंगसंगतीचा कलाविष्कार घडलेल्या भव्य अशा मूर्तींनी यंदा सुरत, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, मलकापूर, खामगाव, जळगाव, एरंडोल, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, रावेर व बºहाणपूरला भरारी घेतली आहे. पूर्वी बºहाणपूर येथील मूर्ती रावेरला आणल्या जात असत. आता मात्र मूतीर्ची भावसरीता उलट्या दिशेने वाहू लागल्याचे चित्र आहे.