रावेरला १२ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 06:41 PM2021-04-02T18:41:16+5:302021-04-02T18:41:23+5:30
पोलिसांची कारवाई, कोरोना संदर्भातील नियम न पाळणाऱ्यांवर नजर
रावेर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे हातगाडी लावून फळे, भाजीपाला, बेकरी उत्पादनाच्या वस्तू विक्री करताना रहदारीत अडथळा निर्माण करणार्या १२ विक्रेत्यांविरूध्द पोलीस पथकाने धडक कारवाई करून रावेर पोलिसात खटले दाखल केले असून, त्यांना रावेर न्यायालयासमोर हजर राहण्याची समज दिली आहे.
रावेर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी फौजदार मनोहर जाधव, पोहेकॉ. गोपाळ पाटील, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. रुपेश तोडकर, योगेश सावळे, सुकेश तडवी, कुणाल सोनवणे, होमगार्ड कांतीलाल तायडे, राहुल जाधव यांच्या पथकाने रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून फळे, भाजीपाला, पाव बिस्कीट वा खारी टोस्ट विक्री करून रहदारीत अडथळा निर्माण करताना शेख फारुख शेख कद्रुद्दीन, सुनील रघुनाथ शिरतुरे, गौतम गोविंदा बाविस्कर, इस्माईल खान मारेखान, शेख कलीम शेख कादर, शेख नाजिम शेख रशीद, शेख वसीम शेख रशीद, मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर, प्रदीप लक्ष्मीचंद गेरा, निवृत्ती तुकाराम पाटील, गोपाळ अशोक भोई, विशाल राजकुमार पारवाणी हे आढळून आले. त्यांचे हातकाटे व वजनमापे जप्त करून त्यांना तातडीने घटनास्थळावरून हाकलून लावत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम १०२ /११७ प्रमाणे रावेर पोलीस स्थानकात खटले दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांना कोर्टात हजर राहण्याची लेखी समज दिली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, अन्यथा संबंधीत हातगाडीवाल्यांवर व रस्त्यावर विक्री करणार्यांविरूध्द मुबई पोलीस कायदाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.