रावेरला शिक्षकाच्या घरातून ६७ लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:01+5:302021-09-27T04:19:01+5:30
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तडवी कॉलनीतील रहिवासी व सावखेडा जि.प. शाळेतील शिक्षक मुस्ताक रसूल तडवी हे शुक्रवारी ...
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तडवी कॉलनीतील रहिवासी व सावखेडा जि.प. शाळेतील शिक्षक मुस्ताक रसूल तडवी हे शुक्रवारी रात्री परिवारासह घरात झोपले होते. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यावेळी खिडकीचे लोखंडी ग्रील तोडलेले दिसले. चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले आणि तिजोरीतील ४३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मणी, दोन अंगठ्या, कानातील रिंग व मंगळसूत्र, तसेच २४ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या बांगड्या, तोरड्या, असा ६७ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे आढळून आले.
याप्रकरणी मुस्ताक तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुरेश मेढे पुढील तपास करीत आहेत.