रावेर लोकसभा : मलकापूर मतदारसंघात ९ वाजेपर्यंत ८.१२ टक्के मतदान
By सदानंद सिरसाट | Published: May 13, 2024 11:09 AM2024-05-13T11:09:56+5:302024-05-13T11:10:09+5:30
सकाळपासूनच मतदार संघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदार मतदानासाठी पुढे आले. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा समप्रमाणात त्यात सहभाग आहे.
मलकापूर : रावेर लोकसभेच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघात सकाळच्या पहिल्या दोन तासांच्या सत्रात ८.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वातावरण ढगाळ असल्याने मतदारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे येत्या दोन तासात मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रावेर लोकसभा निवडणूकीसाठी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.
सकाळपासूनच मतदार संघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदार मतदानासाठी पुढे आले. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा समप्रमाणात त्यात सहभाग आहे.
दरम्यान, मलकापूर विधानसभा मतदारसंघात पुरुष, महिला, तरुण त्याचबरोबर वयोवृद्ध देखील मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.सकाळच्या दोन तासांच्या सत्रात ८.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यात वाढ होण्याची शक्यता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी व्यक्त केली आहे.