रावेर पोलिसांकडून अवैध दारूचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 07:54 PM2018-12-01T19:54:29+5:302018-12-01T19:56:30+5:30
रावेर पोलिसांनी गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करून १४ ठिकाणी गावठी, देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व पाच ठिकाणी अवैध दारूची अवैध वाहतूक करताना अकस्मात टाकलेल्या धाडीत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रावेर, जि.जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी अवैध धंद्यांविरूध्द राबवलेल्या मोहिमेंतर्गत रावेर पोलिसांनी गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करून १४ ठिकाणी गावठी, देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व पाच ठिकाणी अवैध दारूची अवैध वाहतूक करताना अकस्मात टाकलेल्या धाडीत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार अमृत पाटील, सहाय्यक फौजदार शरीफ तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजू जावरे, श्रीराम वानखेडे, गफुर शेख, जितेंद्र पाटील, जितेंद्र नारेकर, जितेंद्र जैन, ईस्माईल शेख, अर्जुन सोनवणे, पो.ना.हरिलाल पाटील, ओमप्रकाश सोनी, अतुल तडवी, रोहील गणेश, पो.कॉ.जाकीर पिंजारी, नरेंद्र बाविस्कर, सुरेश मेढे, विकास पहूरकर, मंदार पाटील, संदीप धनगर, संदीप पाटील, नीलेश चौधरी, योगेश चौधरी, हर्षल पाटील, तुषार मोरे यांच्या विविध पथकांनी अचानक छापे टाकून चार हातभट्टया उद्ध्वस्त करीत ७०० लीटर गूळ व मोह मिश्रीत गावठी दारूचे रसायन फेकून धडक कारवाई केली. १४ केसेसमध्ये अवैध दारू बाळगल्याप्रकरणी, तर पाच केसेसमध्ये अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून १०५ लिटर गावठी दारू तर देशी-विदेशी दारूसह बियरच्या १०० बाटल्या असा ९२ हजार ७३५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.