रावेरला झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:17 PM2020-05-15T16:17:57+5:302020-05-15T16:22:59+5:30
फकीर वाड्यामागे सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर, जि.जळगाव : शहरातील फकीर वाड्यामागे सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ६८ हजार रू रोख, पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्य जप्त करून, जुगार खेळताना आढळले. चार जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी सव्वाचारला करण्यात आली.
सूत्रांनुसार, शहरातील फकीर वाड्या मागे खारोन नाल्यातील चिंचेच्या झाडाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त खबर फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळाली. त्यावरून पो.काँ. तुषार मोरे पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो.ना.ओमप्रकाश सोनी, पो. काँ. विकास पहूरकर यांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यात प्रमोद रामदास महाजन (३४), बापू सुकलाल महाजन (४१), जगन पुंजाजी तायडे (५२), करण मुकुंदा शिरतुरे सर्व रा.रावेर हे झन्ना मन्ना जुगारावर पैसे लावून रंगेहाथ खेळताना व खेळविताना मिळून आले. या धाडीत ६८ हजार रू. रोख, पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ.तुषार मोरे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन रावेर पोलिसात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना. सुरवाडे करीत आहे