रावेरला केळी भावात 20 रुपयांनी वाढ

By Admin | Published: January 9, 2017 12:12 AM2017-01-09T00:12:16+5:302017-01-09T00:12:16+5:30

रावेर येथे 20 रुपयांनी केळी भावात वाढ झाली तर जळगाव आणि चोपडा येथे 11 रुपयांनी भावात वाढ झाली.

Raver raises banana prices by 20 rupees | रावेरला केळी भावात 20 रुपयांनी वाढ

रावेरला केळी भावात 20 रुपयांनी वाढ

googlenewsNext

साकळी, ता.यावल : रावेरसह जिल्ह्यात 9 तारखेसाठी पुन्हा केळी भावात वाढ झाली आहे.  रावेर येथे 20 रुपयांनी केळी भावात वाढ झाली तर जळगाव आणि चोपडा येथे 11 रुपयांनी भावात वाढ झाली. केळीच्या मागणीत वाढ झाली असून केळी कापणीचे प्रमाण कमी झाल्याने केळी भावात वाढ होत आहे.
दरम्यान, ब:हाणपूरला मात्र 9 साठी केळी भावात घसरण झाली़
रावेर येथे नवती केळी पिलबाग केळी व कांदेबाग केळीचे भाव 940 रुपये क्विंटल फरक 24 म्हणजेच उच्च प्रतिच्या केळीचे भाव 1084 रुपये क्विंटल असे वाढले आहे. रावेर येथे जुनारी केळीचे भाव 820 रुपये फरक 20 असे वाढले आहे तर रावेर येथे वापसी केळीचे भाव 425 रुपये क्विंटल असे वाढले आहे.
रावेरसह जळगाव आणि चोपडा येथे ही केळी भावात वाढ झाली. मात्र दोन्ही ठिकाणी केळी भावात कमी म्हणजे 11 रुपयांनी भाव वाढ झाली. जळगाव येथे कांदेबाग केळीचे भाव 921 रुपये क्विंटल फरक 20 निघाल़े चोपडा येथे कांदेबाग केळीचे भाव 911 रुपये क्विंटल फरक 20 असे वाढले.
ब:हाणपूरला मात्र केळी भाव घसरण
ब:हाणपूरला 8 तारखेसाठी केळी भावात 504 रुपयांनी वाढ होऊन केळी भाव एक हजार 754 रुपये असे वाढले तर 9 तारखेसाठी ते कमी आवक 13 ट्रकही होऊन एकच दिवसात भाव 444 रुपयांनी घसरून तेथे भाव एक हजार 310 रुपये क्विंटल असे घसरले. ब:हाणपूर येथे कमी रासच्या केळी भावात ही घसरण झाली ते 600 रुपये असे झाले.

Web Title: Raver raises banana prices by 20 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.