रावेर तालुक्यात १० तर अमळनेरमध्ये ११ गावे संवेदनशील

By Admin | Published: February 11, 2017 12:19 AM2017-02-11T00:19:33+5:302017-02-11T00:19:33+5:30

जि़प़ व पं़स़ निवडणुक : अमळनेरात जिल्हाधिकाºयांची पोलीस अधिक्षकांसह भेट

Raver Taluka 10 and Amalner 11 villages sensitive | रावेर तालुक्यात १० तर अमळनेरमध्ये ११ गावे संवेदनशील

रावेर तालुक्यात १० तर अमळनेरमध्ये ११ गावे संवेदनशील

googlenewsNext

रावेर/अमळनेर : तालुक्यातील १० गावांमधील ४४ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे निवडणूक यंत्रणेने घोषीत केले आहे. अशा गावांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मुंबई पोलीस अधिनियम १४९ अन्वये नोटीस बजावून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अमळनेर येथे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी भेट देवून तडीपारचे प्रस्ताव निकाली काढून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले़
 रावेर तालुक्यात मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या कक्षेपलीकडे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राखून व्हीडीओ चित्रणाद्वारे संवेदनशील केंद्रावर सुक्ष्मनजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, नायब तहसीलदार उमाकांत कडनौर यांनी दिली.
जि.पं.-पं.स. निवडणुकीसाठी   २०७ मतदान केंद्र आहेत. त्यातील १० केंद्र संवेदनशील असल्याचा संयुक्त अहवाल फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
त्यात रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत अहिरवाडी (तीन मतदान केंद्र), रसलपूर (पाच मतदान केंद्र), वाघोड (तीन मतदान केंद्र), खिरवड (दोन मतदान केंद्र), अजंदा (दोन मतदान केंद्र), पाल (चार मतदान केंद्र) अशी सहा गावांमधील १९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सावदा पोलीस स्टेशनअंतर्गत चिनावल (नऊ मतदान केंद्र) व वाघोदा बु.।। (सात मतदान केंद्र) असे १६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत विवरे बु.।। (६ मतदान केंद्र) तर खिर्डी बु.।। येथील (३ मतदान केंद्र) असे नऊ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
१२ रोजी मतदान यंत्रांची                सेटींग व सिलिंग
 रावेर तहसील कार्यालयातंर्गत असलेल्या खुल्या जागेत शामीयाना उभारण्यात आला आहे. रविवार, १२ रोजी २०७ मतदान केंद्रावरील मतदान यंत्राचे मतदान पत्रिकेसह सेटींग व सिलिंग करण्यात येणार आहे. त्याकरीता २५ टेबलवर प्रत्येकी सात कर्मचाºयांद्वारे ही प्रक्रिया पार पडणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. जि.पं.-पं.स. उमेदवार वा उमेदवार प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नायब तहसिलदार उमाकांत कडनौर यांनी दिली.           (वार्ताहर)
अमळनेर तालुक्यातील  संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रीत ठेवा, तसेच तडीपारचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढा अशा सूचना जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी आज अधिकाºयांना दिल्या.
४जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी प्रांत कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, सां.बा.चे.उपविभागीय कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, पोलीस निरीक्षक विकास वाघ, मारवडचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहायक गटविकास अधिकारी बी.डी.गोसावी, कृषी अधिकारी बी.जी.पाटील हजर होते.
४अमळनेर पोलीस स्टेशनअंतर्गत जानवे, शिरूड, पिळोदा, पातोंडा, दहीवद, मठगव्हाण तर मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत अमळगाव, मांडळ, खापरखेडा, वासरे, कळमसरे ही ११ गावे संवेदनशील असून, या गावांकडे प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी लक्ष ठेवावे असेही यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
४बैठकीनंतर अधिकाºयांनी मतदानपेट्या ठेवण्यात येणाºया इंदिरा भवनची पहाणी केली.

Web Title: Raver Taluka 10 and Amalner 11 villages sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.