रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:22 PM2018-10-06T22:22:42+5:302018-10-06T22:23:36+5:30

यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

In Raver taluka, the groundwater level dropped by 15 feet in the monsoon | रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

googlenewsNext
ठळक मुद्देरब्बी व बागायतीला पिकांना जाणवू लागलाय धोका केळीबागा वाचवण्यासाठी आतापासूनच पाणी कपात करून हजारो केळी खोडं सोडले वाºयावरउत्पादन खर्चही निघणे झाले अवघड

रावेर, जि.जळगाव : तालुक्यात यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाळ्याच्या उत्तरार्धातच १५ ते २० फुुटांनी विहिरींंची भूजलपातळी खालावली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आतापासूनच हजार- दोन हजार केळीची खोडांच्या पाण्यात कपात करून हजारो खोडं वाऱ्यावर सोडल्याची विदारक परिस्थिती आहे.
रावेर तालुक्यात यावर्षी झालेल्या पर्जन्यमानातील पहिल्या रोहिणी ते आश्लेषा पर्जन्य क्षेत्रापर्यंतच्या निम्मे पर्जन्य नक्षत्रात केवळ ३४ टक्के पर्जन्यमान तीन आठवडे तथा महिनाभराच्या खंडानंतर अनियमितपणे झाले. परिणामी खरीप हंगाम केवळ आॅक्सीजनवर ठेवल्यागत तगला.
दरम्यान, दुसºया सत्रातील मघा पर्जन्यनक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा अर्धशतकी टप्पा पार पडला. खरिपाची खुंटलेली वाढ वाढीस लागण्यासाठी सदरचा पाऊस अनुक ठरला होता, तर तालुक्यातील सुकी, मंगरूळ व आभोडा या मध्यमसिंचन प्रकल्पासह गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन झालेल्या विसर्गाचे जेमतेम पाणी सुकी, भोकर व नागोई नद्यांमधून वाहून निघाले होते.
दरम्यान, खरीपाचा हंगाम ऐन फुल व फलधारणेच्या अवस्थेत असताना पूर्वा पर्जन्यनक्षत्र व उत्तरा नक्षत्राचा पूर्वाध अशा महिनाभराच्या कालखंडानंतर पावसाने २२ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्राच्या उत्तरार्धात रात्री संततधार व दमदार हजेरी लावून फलधारणेतील खरीपाला अमृत संजीवनी दिली होती. या तब्बल महिनाभराच्या कालखंडानंतर झालेल्या पावसाने तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाची सत्तरी पार करून ७१.१४ टक्के पर्जन्यमानाने यंदा कमाल मर्यादा गाठली. १२ पैकी १० पर्जन्यनक्षत्र आटोपूनही तालुक्यात जीवनवाहिन्या ठरलेल्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण, या नद्यांची अद्यापही घशाशी आलेली कोरड पुन्हारूपी न शमल्याची मोठी शोकांतिका आहे. चिंचाटी व मात्राण लघुसिंचन प्रकल्प अद्यापही सिंचनाची साठी ओलांडू शकली नसल्याचे भीषण आहे.
या पर्जन्यमानातील उत्तराच्या उत्तरार्धातच पावसाने धूम ठोकल्याने पडत झडत तगलेला खरीप घटते उत्पन्न देणारा असला तरी, उर्वरित हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्र कोरडेठाक जाण्याची भीती असल्याने आहे. तसेच पितृपक्षातील उन्हाने उन्हाळ्यातील मे हिटच्या तडाख्यालाही लाजवत जबर उष्णता ओकल्याने तालुक्यातील भूजलपातळी आता पावसाळ्यातच तब्बल १५ ते २० फूट खोलवर घसरली असून, आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली आहे.
भर पावसाळ्यात विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर खालावल्याने आतापासूनच विहिरींचा टप्पा पध्दतीने उपसा होऊ लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा भयभीत झाला आहे. रब्बी व बागायती पिकांची चिंता शेतकरीवर्गाची झोप उडवणारी ठरली आहे. या पावसाळ्यात केलेल्या मृगबहार केळीबागांमधील भविष्यातील भूजलटंचाईचा नियोजन व कृती आराखडा म्हणून तालुक्याच्या पूर्व भागातील खानापूर, चोरवड, निरूळ, पाडळे, वाघोड व कर्जोद शिवारातील केळी उत्पादक शेतकºयांनी आपापल्या भूजल साठ्याच्या व भूजलस्त्रोतांचा वेध घेत कुणी एक हजार तर कुणी दोन हजार केळी बागेतील खोडांच्या पाण्याची कपात करून हजारो खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती दुष्काळाची जणूकाही चाहूल करून देणारी ठरली आहे.
तब्बल पाच ते सहा महिन्यांत केळीबागांच्या लागवडीपासून, ठिबक सिंचन, रासायनिक खतांच्या मात्रा, आंतर मशागतीचा खर्च, फर्टीगेशन, न्युट्रीशन यावर केलेला लाखो रूपयांचा खर्च निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त केळीबागा भूजलाअभावी वाºयावर सोडल्याने किमान घटत्या खरीपाचे येणाºया उत्पन्नाचे तेलही गेले अन् लागवडीखालील केळी बागायतीच्या उत्पन्नाचे तूपही गेल्याने शेतकरीवर्ग कमालीचा कर्जाच्या खाईत बुडाल्याची विदारक अवस्था निर्माण झाली आहे.
खानापूर येथील ग्रामपंचायत सदस्य भुवनेश्वर महाजन, अनंत भावडू धांडे या शेतकºयांनी त्यांचे प्रत्येकी पाच ते सहा हजार केळी बागेतील एक ते दोन हजार केळीचे खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.




 

Web Title: In Raver taluka, the groundwater level dropped by 15 feet in the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.