रावेर तालुक्यात ५३.६३ टक्के पाऊस पण सातही धरणे निम्म्याहूनही खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 04:53 PM2019-08-04T16:53:19+5:302019-08-04T16:54:35+5:30

रावेर तालुक्यात आजपावेतो ५३.६३ टक्के अर्थात निम्मे पर्जन्यमान झाले असले तरी, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी धरणांच्या सातपुड्यातील पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या धरणांमध्ये मात्र निम्मे साठाही अद्याप झाला नसल्याची शोकांतिका आहे.

In Raver taluka it is less than 1.5 percent but less than half the dams | रावेर तालुक्यात ५३.६३ टक्के पाऊस पण सातही धरणे निम्म्याहूनही खालीच

रावेर तालुक्यात ५३.६३ टक्के पाऊस पण सातही धरणे निम्म्याहूनही खालीच

Next
ठळक मुद्देरावेर : सातपुड्यातील धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाणवाभूजल संकट ‘आ’वासून?

रावेर, जि.जळगाव : तालुक्यात आजपावेतो ५३.६३ टक्के अर्थात निम्मे पर्जन्यमान झाले असले तरी, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी धरणांच्या सातपुड्यातील पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या धरणांमध्ये मात्र निम्मे साठाही अद्याप झाला नसल्याची शोकांतिका आहे. खरीपाला तगवणाऱ्या या रिमझिम पावसाने मात्र भूजलपातळी उंचावण्यासाठी फारसा फायदा होणार नसल्याने तालुक्यात दमदार पावसाची कमालीची प्रतीक्षा आहे.
रोहिणी, मृग,आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य पर्जन्यनक्षत्र आटोपून आश्लेषा नक्षत्रास आरंभ झाला आहे. निम्मे पर्जन्य नक्षत्रात तालुक्यात ५३.६३ टक्के पाऊस झाला आहे. आज पहाटे १०.७१ मि. मी. सरासरी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. खरीपाच्या कापूस, ज्वारी, मका, उडीद, मूग, भुईमूग पिकांना हा पाऊस तारणारा असला तरी, भूजलपातळी उंचावण्यासाठी मात्र हा पाऊस पुरेसा नसल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे.
निम्मे पर्जन्य नक्षत्रात ५३ टक्के पर्जन्यमान झाले असले तरी, सुकी धरण ४० टक्के, मंगरूळ धरण ४७ टक्के, आभोडा धरण ५० टक्के व गंगापुरी, मात्राण, चिंचाटी लघुसिंचन प्रकल्प तर २५ टक्केही भरली नसल्याची शोकांतिका आहे. या सहाही धरणांच्या सातपुड्याच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाअभावी निम्मे पावसाळा होऊनही धरणे भरली नसल्याने, भूजलसंकट आवासून असल्याची चिंता शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

Web Title: In Raver taluka it is less than 1.5 percent but less than half the dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.