रावेर तालुक्यात सरपंचपदासाठी चुरसीची लढत

By admin | Published: July 7, 2017 12:05 PM2017-07-07T12:05:26+5:302017-07-07T12:05:26+5:30

तालुक्यातील 33 पैकी 22 ग्रामपंचायतीत रंगणार सामना, हालचालींना वेग

In Raver taluka, there is a challenge for sarpanch | रावेर तालुक्यात सरपंचपदासाठी चुरसीची लढत

रावेर तालुक्यात सरपंचपदासाठी चुरसीची लढत

Next

 ऑनलाईन लोकमत

रावेर ,दि.7 - तालुक्यातील 33 ग्रा.पं.च्या आगामी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट आम जनतेतून होणार असल्याने सर्वसाधारण व नामाप्रवर्ग तथा या दोन्ही प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित   सरपंचपदाच्या 22 ग्रा.पं.मध्ये काटय़ाच्या व अटीतटीच्या लढतींचा सामना पाहायला मिळणार आहे. 
अनु.जाती व जमातीतील राखीव सरपंचपदाच्या उर्वरित ग्रा.पं.मध्येही गावातील गटतटाच्या राजकारणामुळे रंगत येईलच; पण नामाप्रवर्ग व सर्वसाधारण गटात मात्र जातीपातीच्या राजकारणाचा अधिक ज्वर येत असल्याने मोठी रंगत थेट निवडणुकीमुळे येणार असल्याचे चित्र आहे. 
तालुकाभरात सर्वात मोठी ग्रा.पं. असलेल्या चिनावल येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने ‘मिसेस सरपंच’ म्हणून इच्छुक उमेदवारांना सरपंच निवडीचे वेध  लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या पं.स.व जि.प. सार्वत्रिक निवडणुकीचे चिनावल ग्रा.पं. सरपंच निवडणुकीत पडसाद पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.  वाघोदा बु.।। येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी  राखीव झाल्याने दंडबैठका घालून तालीम करणा:या अनेक इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. 
सर्वसाधारण सरपंच  खुर्द, सिंगत 
सर्वसाधारण महिला - अजंदे, थेरोळे, निंभोरासीम, कुंभारखेडा, सावखेडा खु.।।, सावखेडा बु.।। व मांगी - चुनवाडे.
असे आहे आरक्षित सरपंचपद  
कांडवेल अनुसूचित जाती महिला- उटखेडा व शिंगाडी,अनुसूचित जमाती-अभोडा बु.।।, खिरोदा प्र यावल, वाघोदा बु.।।, खिर्डी बु.।।, जानोरी अनुसूचित जमाती महिला -रोझोदा, सुनोदा, नामाप्रवर्ग - भाटखेडा, अटवाडे, नेहते, खिरवड, पातोंडी, व बलवाडी, नामाप्रवर्ग महिला- नांदुरखेडा, दोधे, कळमोदा, कोचूर खु.।। - बोरखेडासीम, गाते.
 

Web Title: In Raver taluka, there is a challenge for sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.