रावेरला कोरोना लस जनजागृती रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:26+5:302021-05-25T04:18:26+5:30

सध्या देशभरात कोरोना महामारीचे गंभीर संकट आल्याने त्यावर लसीकरण हेच प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लवकरात ...

Raverla Corona Las Awareness Chariot | रावेरला कोरोना लस जनजागृती रथ

रावेरला कोरोना लस जनजागृती रथ

Next

सध्या देशभरात कोरोना महामारीचे गंभीर संकट आल्याने त्यावर लसीकरण हेच प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लवकरात लवकर आपले व आपल्या कुटुंबीयांचे लसीकरण करून आपली जबाबदारी पार पाडावी. तसेच विनाकारण बाहेर फिरू नये, सामाजिक अंतर पाळावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या जनजागृती रथाद्वारे करण्यात येणार आहे. लसीकरण जनजागृती रथाच्या उद्घाटनप्रसंगी रावेर नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, आरोग्य सभापती ॲड. सूरज चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, दीपक नगरे, पोलीस कॉन्स्टेबल भागवत धांडे, पो.कॉ. राजेंद्र करोडपती, तुषार मानकर, रवींद्र महाजन, पो. कॉ. पुरुषोत्तम पाटील, तसेच रावेर विकास युवाशक्ती फाउंडेशनचे प्रवीण चौधरी, पंकज चौधरी, अमोल कासार, किरण चौधरी, राहुल चौधरी, राहुल पाटील ,परेश चौधरी, दिनेश चौधरी, सुपर कोळी आदी उपस्थित होते.

Web Title: Raverla Corona Las Awareness Chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.