रावेरला नवजात शिशूला मातेने नाल्यात फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:08 PM2020-12-30T22:08:43+5:302020-12-30T22:10:52+5:30

रावेर येथे नगर परिषदेच्या जुन्या शवविच्छेदन गृहामागे प्रसूती करून एका नवजात शिशूला मातेने नाल्यात फेकल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेचारला उघडकीस आला.

Raver's mother threw the newborn baby into the drain | रावेरला नवजात शिशूला मातेने नाल्यात फेकले

रावेरला नवजात शिशूला मातेने नाल्यात फेकले

Next
ठळक मुद्देसीसीटीव्हीत घटना कैद.आरोपी मातेचा शोध सुरु.

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : नगर परिषदेच्या जुन्या शवविच्छेदन गृहामागे प्रसूती करून नवजात शिशूला मातेने नाल्यात फेकल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेचारला उघडकीस आला.

न.पा.च्या जुन्या रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या शवविच्छेदन गृहामागे असलेल्या काटेरी झुडपात दोन वृध्द महिलांनी त्यांच्यासमवेत गाऊनवर असलेल्या महिलेची प्रसूती करून ते दोन किलो वजन असलेल्या नवजात मुलाला नागझिरी नाल्याचे काठी असलेल्या खोल खड्ड्यात काटेरी झुडपांच्या आडोशाला पॉलीथीनच्या कॅरी बॅगमध्ये फेकून दिल्याची बाब खासगी प्रवासी वाहनांच्या स्टॉपवरील चालक समूहाने उघडकीस आणली. 

गोकुळ भाऊराव करवले यांनी काटेरी झुडपातून हे जिवंत नवजात शिशु बाहेर काढून त्यांच्या साथीदार पिंटू चौधरी, विजय महाजन, विक्रम चौधरी, शिवाजी महाजन, संजय नाथ, नितीन बिरपन  यांच्यासह थेट रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. एका रिक्षात ही गाऊन परिधान केलेली महिला व दोन वृध्दा या रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दुपारी ४ वाजेच्या सुमारास आल्या होत्या. मात्र त्या रूग्णालयात न येताच बाहेर पसार झााल्याची माहीती ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी दिली आहे. किंबहुना, त्यानंतर पुन्हा रिक्षाचालकाने ग्रामीण रुग्णालयात येवून त्या महिलांंची चौकशी केली होती. मात्र त्या इकडेे नसल्याची माहिती रुग्णांंचे नातेेवाईकांनी त्याला दिल्याने त्यानेही काढता पाय घेतल्याचे समजते. 

 याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात मातेविरूध्द व तिच्या सहकाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या बालकाला जळगावच्या नवजात शिशु दक्षता केंद्रात हलवण्यात आले आहे.  दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजवरून अधिक तपास लागू शकणार आहे.
 

Web Title: Raver's mother threw the newborn baby into the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.