रावेरला गणेशोत्सव व मोहर्रमनिमित्त पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:51 PM2020-08-30T17:51:05+5:302020-08-30T17:51:47+5:30
‘श्रीं’ विसर्जन व मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंचलन केले.
रावेर : अनंत चतुर्दशीला होणारे ‘श्रीं’चे विसर्जन व मोहर्रम सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रावेर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरून तडफदार पथसंचलन केले.
यात शीघ्र कृती दलाचे सशस्त्र ५१ जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती येथील प्लाटून, दंगा नियंत्रण पथक व धडक कृती दल, रावेर पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या २०० जवानांनी मोठ्या दिमाखात पथसंचलन करून पोलीस दल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्ज असल्याचे दर्शन घडवले.
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, शीघ्र कृती दलाचे असिस्टंट कमांडंट रमेश वर्मा व सारंग सुर्वे, राज्य राखीव पोलीस दलाचे फौजदार तायडे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे व अनिस शेख यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.