सरदार सरोवर प्रकल्पाच्या गाऱ्हाणे प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी संगीतराव पाटील यांची फेरनियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:04+5:302021-07-04T04:12:04+5:30
चाळीसगाव : महाराष्ट्रातील सरदार सरोवर प्रकल्पाने बाधित झालेल्यांच्या गाऱ्हाण्यांसंदर्भात निकारण प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली असून, चाळीसगाव येथील रहिवासी व ...
चाळीसगाव : महाराष्ट्रातील सरदार सरोवर प्रकल्पाने बाधित झालेल्यांच्या गाऱ्हाण्यांसंदर्भात निकारण प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली असून, चाळीसगाव येथील रहिवासी व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती ३० जून रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने केली आहे. नियुक्तीचे पत्र त्यांना शुक्रवारी प्राप्त झाले.
गेल्या वर्षभरापासून प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचे कामकाज संगीतराव पाटील पाहत आहेत. यावर्षी त्यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे.
सरदार सरोवराने महाराष्ट्रातील बाधितांच्या गाऱ्हाणे निवारण्यासाठी प्राधिकरण निर्मितीचा निर्णय शासनाने गेल्यावर्षी १४ जुलै २०२० रोजी घेतला होता. त्यानुसार निवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांची नियुक्ती केली गेली. शुक्रवारी त्यांना फेरनियुक्तिचे पत्र प्राप्त झाले. गाऱ्हाणे निराकरण प्राधिकरण सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या वर्षासाठी पाटील यांची नियुक्ती केली गेली आहे. १५ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२२ असा त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ राहणार आहे.