जिल्ह्यात टास्क फोर्सची पुन्हा स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:57+5:302021-05-28T04:12:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड १९ व म्यूकरमायकोसीसच्या बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना ...

Re-establishment of task force in the district | जिल्ह्यात टास्क फोर्सची पुन्हा स्थापना

जिल्ह्यात टास्क फोर्सची पुन्हा स्थापना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविड १९ व म्यूकरमायकोसीसच्या बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना या रुग्णांवर योग्य तो औषधोपचार, सल्ला, मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्सची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसीसचे रुग्ण आढळुन येत आहेत. त्या रुग्णांसाठी उपचार आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच उपलब्ध करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील दंतरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ यांचा सल्ला घेण्यासाठी जिल्ह्यातील ४० व्यक्तींच्या टास्क फोर्सची पुन्हा स्थापना करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

टास्क फोर्सचे सदस्य कोविड १९ आणि म्यूकरमायकोसीस बाधित रुग्ण व गंभीर रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांना आवश्यक वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

कोण आहे टास्क फोर्समध्ये

या टास्क फोर्समध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील कान, नाक, घसा तज्ञ, सुक्ष्मजीवशास्त्र तज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह इतर डॉक्टर अशा ४० जणांचा त्यात समावेश आहे.

Web Title: Re-establishment of task force in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.