दहावी-बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची २० नोव्हेंबरपासून फेरपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:37 PM2020-11-12T19:37:15+5:302020-11-12T19:37:29+5:30

२३५९ विद्यार्थी बसणार : २१ केंद्रसंचालकांची नियुक्ती ; दहावीसाठी १३ तर बारावीसाठी ८ परीक्षा केंद्र

Re-examination of failed students of 10th-12th from 20th November | दहावी-बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची २० नोव्हेंबरपासून फेरपरीक्षा

दहावी-बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची २० नोव्हेंबरपासून फेरपरीक्षा

Next

जळगाव : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कमी प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मात्र, आता याही विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पार पडणार आहे. ही फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे.

दरवर्षी दहावी व बारावीचा निकाल लागताच महिनाभरात फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा कोरोना व लॉकडाऊनमुळे फेरीपरीक्षा तातडीने होऊ शकली नाही. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत फेरीपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात दहावीचे १३ तर बारावीचे ८ परीक्षा केंद्र असणार आहे़ तसेच मराठीच्या पेपरने फेरपरीक्षेला सुरूवात होणार आहे.

Web Title: Re-examination of failed students of 10th-12th from 20th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.