"मुक्त"च्या पुनर्परीक्षेला ३ मेपासून होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:59+5:302021-04-28T04:16:59+5:30

जळगाव : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने ३ मेपासून बी. ए., बी. कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांतील रिपिटर विद्यार्थ्यांची ...

The re-examination of "Mukta" will start from May 3 | "मुक्त"च्या पुनर्परीक्षेला ३ मेपासून होणार प्रारंभ

"मुक्त"च्या पुनर्परीक्षेला ३ मेपासून होणार प्रारंभ

Next

जळगाव : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने ३ मेपासून बी. ए., बी. कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांतील रिपिटर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्‍यात आली आहे.

या परीक्षांचे वेळापत्रक व संपूर्ण माहिती ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पोर्टलवर जाहीर करण्‍यात आली आहे. नव्याने प्रवेशित शैक्षणिक वर्ष २०२० - २१ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै - ऑगस्ट मध्ये होणार आहे. तसेच तसेच एम. बी. ए.च्या नियमित व रिपिटर विद्यार्थ्यांच्या सत्र पद्धतीच्या परीक्षेला ५ मेपासून प्रारंभ होत आहे. याबाबतची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेबाबत तसेच परीक्षा देताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तांत्रिक सहाय्यक संदीप देशमुख व अभिजित चांदवडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे यांनी केले आहे.

Web Title: The re-examination of "Mukta" will start from May 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.