तीस वर्षांनंतर तयार केलेल्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:13+5:302021-07-07T04:20:13+5:30
शहरातील काही भागांतील अंतर्गत रस्ते हे गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून झाले नसल्याचे जाणकार सांगतात. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोट्यवधींच्या रस्त्यांच्या ...
शहरातील काही भागांतील अंतर्गत रस्ते हे गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून झाले नसल्याचे जाणकार सांगतात. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. कधी कामाच्या दर्जावरून वाद झाले, तर कधी माजी मंत्री खडसे यांनी येऊन रस्त्याची पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या.
पूर्ण झालेल्या रस्त्यावर काम
शांतीनगर येथील रस्ते झाल्यानंतर अमृत योजनेसाठी खोदकाम करण्यात आले याशिवाय जळगाव रोडवरील सातारा ते महात्मा गांधी पुतळ्याला जोडणाऱ्या मार्गावर खोदकाम केले जात असताना नव्याने डांबरीकरणासाठी बीबीएम करण्यात आलेल्या रस्त्यावर माती टाकली जात आहे. नवीन झालेल्या रस्त्याच्या बाजूला मातीचे ढीग टाकण्यात येत आहेत. यामुळे नवीन झालेले रस्ते हे पूर्णत: चिखलमय होऊन नागरिकांना त्रास होणार असल्याने नापसंती व्यक्त केली जात आहे.
फोटो कॅप्शन :-शांतीनगर येथील रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर बाजूला अमृत योजनेचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले, यामुळे रस्त्याची वाट लागण्याची शक्यता आहे.