महिलेला रिॲक्शन, दोघे घाबरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:52+5:302021-01-17T04:14:52+5:30
कोट लस घेतली दिवसभर कुठलाही त्रास झाला नाही. लसीकरणाची प्रक्रिया ही अगदी साधी सोपी आणि सुरक्षीत आहे. सर्वांनी ...
कोट
लस घेतली दिवसभर कुठलाही त्रास झाला नाही. लसीकरणाची प्रक्रिया ही अगदी साधी सोपी आणि सुरक्षीत आहे. सर्वांनी लस घ्यावी, या मोहीमेत सहभाग घ्यावा. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
लस घेतली कुठलाही त्रास झाला नाही. कुणीही न घाबरता पुढे यावे, लस घ्यावी. जिल्ह्यात पहिल्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांनी कामामुळे लस घेतली नाही, शिवाय अनेकांना थोडी भीती होती. मात्र, सर्वांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आज लस घेतली. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
लस अत्यंत सुरक्षीत आहे. कुठलाही त्रास जाणवला नाही, किंवा लस घेताना दुखत सुद्धा नाही. अर्धा तास निरीक्षणाखाली रहावे लागते. सोपी, सुटसुटीत प्रक्रिया असून न घाबरता लस घ्यावी. - डॉ. विजय घोलप, वैद्यकीय अधिकारी
लस घेऊन आठ तासानंतरही कसलाही त्रास जाणवला नाही. अत्यंत सुरक्षीत लस आहे. प्रक्रिया, नियोजनही उत्तम आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही आपल्याला नियम पाळायचेच आहेत. सर्वांनी न घाबरता लस घ्यायला पुढे यावे, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घ्यावा. -
कविता नेतकर, अधिसेविका