विहिरीत पडलेल्या बिबट्याचे प्राण वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 09:57 PM2019-07-16T21:57:22+5:302019-07-16T21:57:41+5:30
पारोळा तालुक्यातील सोके गावातील घटना
पारोळा : तालुक्यातील सोके गावातील विहिरीत पडलेल्या बिबट्याचे प्राण वाचविण्यात अखेर वनविभागाला यश आले.
जळगाव वनविभागाअंतर्गत पारोळा वनक्षेत्रातील सोके येथील गावातील शेतकरी दयाराम रूपचंद पाटील यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. हा घटना १६ जुलै रोजी सकाळी घडली. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनानुसार खाट विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढले. सदर बिबट्या अंदाजे ४ वर्षांचा असून तो नर जातीचा आहे.
सोके गावातील सरपंच अमोद दगडू पाटील, पोलीस पाटील देवाजी शांताराम पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचे प्रण वाचविण्यात यश आले आहे, अशी माहिती वनविभागाने दिली.