वाचनाने समाजात विवेकवाद वाढतो- डॉ.उदय खैरनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 02:19 PM2019-12-01T14:19:32+5:302019-12-01T14:20:45+5:30
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छात्रभारतीचे ज्येष्ठ सैनिक पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार यांनी विद्यार्थ्यांना १०० वैचारिक मूल्यांची पुस्तके मोफत वितरीत केली.
अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छात्रभारतीचे ज्येष्ठ सैनिक पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार यांनी विद्यार्थ्यांना १०० वैचारिक मूल्यांची पुस्तके मोफत वितरीत केली.
यावेळी खैरनार म्हणाले की, सानेगुरुजीच्या स्वप्नातील धडपडणारी मुले निर्माण करण्यासाठी समाजात विवेकवाद वाढीस लागला पाहिजे. विद्यार्थिदशेपासून पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त वैचारिक पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनाने समाजात विवेकवाद वाढत जातो म्हणूनच मी ही १०० पुस्तके वाटली आहेत.
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे, सांस्कृतीक विभागप्रमुख ईश्वर महाजन, स्काऊट शिक्षक एस. के. महाजन एच.ओ. माळी होते.
शिक्षक आय.आर.महाजन यांनी प्रस्ताविक केले. खैरनार यांनी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केलेले आहेत.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.