विविध स्पर्धातील सहभागाने वाचन, लेखन झाले समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:59 AM2017-09-20T01:59:30+5:302017-09-20T01:59:46+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत प्रा.डॉ.शकुंतला चव्हाण.
शालेय जीवनापासूनच वाचन लेखनाची प्रेरणा मिळाली. घरात शैक्षणिक वातावरण होते. शाळेतील वाचनालयातून पुस्तके, मासिके, काव्यकथा, कादंबरी व विविध साहित्य वाचायला आवडायचे. पुढे औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना विविध स्पर्धामध्ये भाग घेत असे. त्यातून वाचन, लेखन, वक्तृत्व समृद्ध होत गेले. महाविद्यालयातील ‘नवरंग’ वार्षिक अंकासाठी लिखाण केले. हजारो विद्याथ्र्यामधून सवरेत्कृष्ट लेखनाचा बहुमान मिळाला व नवरंग मासिकासाठी विद्यार्थी प्रमुख संपादिका म्हणून निवड झाली. महाविद्यालय खरं तर विद्याथ्र्यासाठी पहिले व्यासपीठ असतं. जिथून विद्यार्थी घडत जातो. मला घडविण्यात कॉलेज व विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. याच ठिकाणी कलाकार, शास्त्रज्ञ यांच्या व्याख्यानांचा, त्याचा अनुभवाचा लाभ घेता आला. सर्वप्रथम माङया कवितेची सुरुवात कॉलेजमधील मासिक, भित्तीपत्रिका यामधून झाली. शिकत असताना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृतमधील पुस्तकातील कवितेशी पहिली ओळख झाली. मैत्री झाली. ती मैत्री इतकी तनामनात भिनली की माङया जगण्याचा एक भाग झाली. कविता करणे म्हणजे कविता होणे असते. त्यासाठी प्रतिभा लागते म्हणूनच म्हटलं जातं. (पोयट आर बॉर्न नॉट टू मेड) कवी जन्म घेतात, निर्माण केले जात नाहीत. कवीची अनुभूती आणि अभिव्यक्ती कवितेला समृद्ध करत असते. माझा साहित्य संपदेत एकूण 14 पुस्तके आहेत. त्यात मराठी, हिंदी, अहिराणी कविता संग्रह, समीक्षात्मक पुस्तके, ललित, वैचारिक साहित्य, स्त्रीवादी साहित्य, लोकसाहित्य, तुलनात्मक साहित्य, मीडिया लेखन आदी पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक कविताना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, तर अखिल भारतीय स्तरावर हिंदी कवितांनी थेट ‘इक्कीसवी सदी के हिंदी श्रेष्ठ कवि एवं कवयित्रीयाँ’ पुस्तकाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडलं. श्रेष्ठ काळजालाच हात घातला. जीवनातील वास्तवाला धीटपणे कवेत घेणारी निर्भय कविता वाचकांना झपाटून टोकल्याशिवाय राहत नाही.