वाचनाने मन समृद्ध होईल- निवृत्ती महाराज इंदुरीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:23 AM2020-01-13T00:23:26+5:302020-01-13T00:24:21+5:30
वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे. अन्यथा येणारा काळ खूप भयानक असल्याचे संकेत राष्टÑीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे कीर्तनात सांगितले.
एरंडोल, जि.जळगाव : वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे. अन्यथा येणारा काळ खूप भयानक असल्याचे संकेत राष्टÑीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे कीर्तनात सांगितले.
एरंडोल येथे रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात मैत्रेसेवा फाउंडेशनतर्फे कल्पतरु वाचनालय अभियानाच्या प्रथम चरणाच्या सांगतेप्रसंगी आयोजित समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात कीर्तन करताना ते बोलत होते.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष नितीन चौधरी, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, उद्योजक संजय काबरा, कुशल तिवारी, नगरसेवक, व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी सत्य व ज्ञानाबद्दल बोलताना अभंगाची संपूर्ण माहिती देत त्यांच्या अध्यायाच्या आधारावर मूुर्ख माणसाला समाजात मान मिळाल्याने सज्जनांना त्रास होत असल्याचे सांगितले. याचबरोबर माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार निधीतून पाच लाख रुपये, तर आमदार चिमणराव पाटील यांनी १० लाख रुपये निधी मैत्री सेवा फाउंडेशनच्या वाचनालयाला निधी देण्याचे जाहीर केले तर सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, संजय काबरा, दशरथ महाजन मित्र मंडळातर्फे कुशल तिवारी, डॉ.प्रशांत पाटील, समाधान पाटील आदींनीसुद्धा यावेळी मैत्री सेवा फाउंडेशनच्या वाचनालय बांधकामास रोख पैशांच्या व वस्तूंच्या रुपात देणगी देण्याचे यावेळी जाहीर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, नीलेश परदेशी, प्रशांत महाजन, आकाश महाजन, नगरसेवक अभिजित पाटील, संघरत्न गायकवाड, जितेंद्र महाजन, अमोल तंबोली, नगरसेवक योगेश महाजन, प्रमोद महाजन, महेंद्र चौधरी, सचिन महाजन, स्वप्नील महाजन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज पाटील, तुषार महाजन, करण पाटील, शुभम महाजन, मनोज महाजन, साहिल पिंजारी, ज्ञानेश्वर महाजन, श्यामसिंग पाटील, हरेश चौधरी, संतोष जैस्वाल, विनीत पाटील, हेमंत पाटील, कुलदीप पवार, गौरव महाजन, निखिल शेंडे, निखिल बाकळे, प्रीतेश पाटील, आदित्य पाटील, रोशन महाजन, जयवीर पाटील, सचिन पाटील, देवेंद्र पाटील, चेतन शिंपी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन किशोर मोरणकार, प्रास्ताविक पीयूष चौधरी तर आभार सागर महाजन यांनी मानले.