दीपनगरातील संच वीजनिर्मितीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 12:49 AM2017-02-03T00:49:48+5:302017-02-03T00:49:48+5:30
राज्यातील विजेची मागणी वाढली : केंद्राकडून (एनटीपीसी) आठ हजार 213 मेगाव्ॉट विजेची खरेदी
भुसावळ : महाजेनकोच्या दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील विजेच्या मागणीअभावी बंद असलेले 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीजनिर्मितीसाठी सज्ज असल्याची स्थिती आहे.
दरम्यान, महावीजनिर्मितीकडून आदेश आल्यावर ते तत्काळ कार्यान्वित करण्यात येतील, असे दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.
तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेची मागणी वाढली आहे. गुरुवारी राज्याची विजेची मागणी तब्बल 20 हजार 912 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती देण्यात आली.
महानिर्मितीची वीजनिर्मिती
शासनाच्या महावीजनिर्मितीची शुक्रवारी 7 हजार 976 मेगाव्ॉट इतकी वीजनिर्मिती होती. यात खाजगी उद्योगांची तीन हजार 408 आणि केंद्राची (एनटीपीसी) आठ हजार 213 मेगाव्ॉट अशी वीज वापरून महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण करण्यात आली़
स्थानिक संच कार्यान्वित करा
दीपनगरातील स्थानिक बंद करण्यात आलेले 210 मेगाव्ॉटचे दोन्ही संच कार्यान्वित केल्यास केंद्राकडून महागडी तीन रुपये 24 पैसे युनिट नुसार वीज घेण्याची गरज भासणार नाही. यासाठी येथील बंद संच तातडीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली.
महानिर्मितीची वीज स्वस्त
शासनाच्या महावीजनिर्मितीची वीज केंद्र आणि खाजगी उद्योगांपेक्षा स्वस्त आहे. ती दोन रुपये 91 पैसे युनिट या दराने उपलब्ध असताना आपण एनटीपीसीची वीज तीन रुपये 24 पैसे युनिट या दराने खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.
वहन होताना नुकसान
दरम्यान, एनटीपीसीची वीज घेताना व तिचे वहन होताना सुमारे 30 ते 35 टक्के विजेचे नुकसान होत असल्याची जाणकारांची माहिती आहे.
स्थापित क्षमता
महावीजनिर्मितीची दररोजची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता 11 हजार 500 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाराष्ट्रातील महाजेनकोची सात वीजनिर्मिती केंद्र आणि जल, वायू आणि सौर ऊज्रेवरील सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू राहिल्यास महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीची 11 हजार 500 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होऊ शकते मात्र यासाठी सर्व संच सुरू असणे गरजेचे आहे. दरम्यान, संच सुरू कधी होतात याकडे लक्ष लागून आह़े
मुबलक पाण्याची सोय
4दीपनगर वीजनिर्मिती केंद्रच मुळात तापी नदीच्या काठावर वसले आहे. पाण्याचा अहोरात्र स्त्रोत आहे. दीपनगरचा स्वत:चा बंधारा आहे शिवाय हे केंद्र आशिया महामार्गावर आहे. निवासांची सोय आहे. पुरेशा प्रमाणात कोळसा आहे. वीज केंद्रार्पयत रेल्वे लाईनचे जाळे आहे आणि विजेची मागणी आह़े असे असताना वीजनिर्मिती संच बंद ठेवू नये, अशी भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वीज संच बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, अशीही कामगारांची भावना आहे. दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पावर सुमारे पाच हजार कुटुंबीयांचा चरितार्थ आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.