जळगावच्या नगरसेविकेचे धरणगाव मुख्याधिकाऱ्यांविरोधात बंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:00 AM2019-02-08T00:00:45+5:302019-02-08T00:01:01+5:30
धरणगावला उपोषण
धरणगाव : धरणगाव शिवारात असलेल्या गट नं.१५७७ मधील १.७७ हे. ही शेतजमीन बिनशेती (एन.ए.) करण्याचा प्रस्ताव देवूनही या प्रकरणी न.पा. मुख्याधिकारी हेतुपुरस्सर त्रास देत असल्याचा आरोप करीत जळगाव महापालिकेच्या नगरसेविका रजनी अत्तरदे, तक्रारदार नयना दीपक चौधरी व अन्य धरणगाव न.पा. समोर उपोषणास बसल्या आहेत. या शेतजमीनीचा जोपर्यत एन.ए. आदेश होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात तक्रारदार नयना चौधरी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, धरणगाव शिवारात गट नं १५७७ हे १.७७ आर. ही शेतजमीन माझ्या मालकीच असून सदर शेतजमीन एन.ए. करण्यासाठी मी धरणगाव न.पा.कडे संपूर्ण कागदपत्र ५ सप्टेंबर २०१८ रोजी दाखल केलेले आहे. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनदेखील व वेळोवेळी पाठपुरावा करुनही न.पा.मुख्याधिकारी हे प्रकरण हेतुपुरस्सर मंजूर करीत नसल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ७ पासून मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ आमरण उपोषण करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर मुख्याधिकारी या प्रकणात पैशांची मागणी करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नयना चौधरी, रजनी प्रकाश अत्तरदे, वर्षा झोपे, मनीषा इंगळे, देवयानी महाजन, मनोज झोपे, धरणगावचे नगरसेवक ललित येवले, कडू बयस, नरेंद्र चौधरी, भीमराज पाटील, संदीप इंगळे, प्रवीण महाजन, योगेश साळुंखे, हर्षल बोरोले, पंढरीनाथ कोल्हे, भिकान शहा, मुन्ना पाटील, दीपक पाटील, आदी उपोषणाला बसले आहेत.