चोपड्यात बंडखोरी ठरली निष्फळ : सेनेने गड राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:07 PM2019-10-24T19:07:42+5:302019-10-24T19:49:15+5:30
चोपडा : चोपडा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी शिवसेनेच्या लता चंद्रकांत सोनवणे या २० हजार ५२९ ...
चोपडा : चोपडा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी शिवसेनेच्या लता चंद्रकांत सोनवणे या २० हजार ५२९ एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांना पराभव पत्करावा लागला.
एकतर्फी निकालाचा प्रत्यय
चुरशीची वाटणारी ही निवडणूक फेरीनिहाय निकाल हाती येऊ लागल्यानंतर मात्र एकतर्फी असल्याचे लक्षात आले. २३ फे-यांपैकी केवळ पहिल्या ५ फे?्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला आघाडी होती. तर उर्वरित प्रत्येक फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याने विजयाची गती कायम असल्याचे दिसून आले. पहिल्या पाच फे-या होईपर्यंत चुरस वाटल्याने रिंगणातील अनेक उमेदवार मतमोजणीस्थळी होते. मात्र त्यानंतर रिंगणातील प्रमुख उमेदवारांनीही काढता पाय घेतला. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर सोनवणे यांचे पुत्र दिनेश सोनवणे १३ व्या फेरीपर्यंत तर माधुरी पाटील या पाचव्या फेरीपर्यंत थांबलेल्या होत्या.