नगरसेवकांचा विद्रोह, आमदारांची रसद..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:18 AM2021-05-27T04:18:04+5:302021-05-27T04:18:04+5:30
सध्या निवडणुका नसल्याने ‘कौन किधर’ हे समजेनासे झाले आहे. एकछत्री निर्णय नसल्याने सत्ताकेंद्रावरील पकड सैल होत आहे. ही पकड ...
सध्या निवडणुका नसल्याने ‘कौन किधर’ हे समजेनासे झाले आहे. एकछत्री निर्णय नसल्याने सत्ताकेंद्रावरील पकड सैल होत आहे. ही पकड सुटण्याआधी खडसे यांना मतदारसंघातील घडी पुन्हा बसवावी लागेल. नाहीतर प्रतिस्पर्धी आ. चंद्रकांत पाटील ज्या वेगाने मतदारसंघात आपला जम बसवत आहे, त्याला आव्हान देणे सोपे नाही. खडसे यांच्या तंबूत असलेले नगरसेवक विद्रोहाची भाषा करण्याइतपत मजबूत होणे, हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीचे यश म्हणावे लागेल. जर उद्या नगरपंचायतमध्ये सत्तापालट झाली तर नवल नसावे. कारण आमदार पाटील दर वेळेस ‘पिक्चर अभी बाकी है’ हे सूचक वक्तव्य करीत आहे. काहीही असो कोरोनाकाळात मंदावलेले राजकारण नगरपंचायतीच्या घडामोडीच्या निमित्ताने गतिमान झाले, याची कुजबूज सुरू आहे.