जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:25 PM2018-12-16T17:25:36+5:302018-12-16T17:27:37+5:30
जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने दिले आहे.
जळगाव : पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१७ मधील १६ हजार शेतकरी व फळ पीक विम्यातील वंचित १८०० शेतकºयांना पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. याखेरीज राष्टÑीयकृत बँकामधील ७ हजार शेतकरीही वंचित होते. त्यासाठी जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने दिले आहे.
जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१७ मधील १६ हजार शेतकरी तर आंबिया बहर फळपीक योजना २०१७ मधील १८०० वंचित शेतकरी सभासद यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळणे साठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार ए. टी. पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्या समवेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, महाव्यवस्थापक एम.टी.चौधरी यांनी राधामोहन सिंह यांची तसेच कृषी विभागाचे सचिव आशिष कुमार भूतानी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वंचित शेतकरी सभासद यांना त्वरित विमा मिळण्यासंदर्भात बाजू मांडली. त्यावर कृषी मंत्री यांनी संबंधित विभागांना त्वरित सदरचा विषय मार्गी लावण्यासाठी आदेश दिले.
या आदेशानुसार द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा सहकारी बँकेच्या १६ हजार शेतकºयांसाठी आणि इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या ७ हजार शेतकºयांसाठी सुमारे १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ एवढी रक्कम जमा केल्याचे पत्र आज दिले आहे. त्यात जिल्हा बँकेच्या शेतकºयांसाठी १८ कोटी ५० लाख ५ हजार ३८५, तर बँक आॅफ बडोदा जानवे शाखेसाठी ७ लाख ५४ हजार ११६ रूपये, देना बँक अमळनेर शाखेसाठी ५० लाख ७३ हजार ९१८ रूपये, नेरी बाजार शाखेसाठी ४२ हजार १७४, निंभोरा शाखेसाठी १ लाख ५७ हजार ५७४ रूपये, पंजाब नॅशनल बँकेच्या अमळनेर शाखेसाठी २५ हजार ७८ रूपये, तर युनियन बँक अमळनेर शाखेसाठी ४३ लाख ९९ हजार २५६ रूपये आले आहेत.