जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे कांदा अनुदान प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:57 PM2019-03-05T18:57:14+5:302019-03-05T18:58:50+5:30

कांदा अनुदानासाठी कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे जळगाव पणन संघाकडून सांगण्यात आले.

Receive first-stage canada grant in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे कांदा अनुदान प्राप्त

जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे कांदा अनुदान प्राप्त

Next
ठळक मुद्दे१२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपये मिळणार७/१२ वर नोंद नसल्याने बसणार फटकाअनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

गोंडगाव, ता भडगाव, जि.जळगाव : कांदा अनुदानासाठी कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे जळगाव पणन संघाकडून सांगण्यात आले.
त्यात चाळीसगाव तालुक्यात ९४९ लाभार्र्थींना ६३ लाख ६६ हजार ६२६ रुपये, चोपडा तालुक्यात २७३ लाभार्र्थींना २९ लाख ७७ हजार २४ रु., तर यावल तालुक्यात एका लाभार्थीस ४० हजार रु. असे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
राज्यात आॅक्टोबर २०१८ नंतर कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत व खासगी बाजार समितीत १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना किमान २०० क्विंटल कांदा विक्री प्रती शेतकरी २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. दुसºया टप्प्यात १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ज्या शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्रीची नोंद केली असेल त्यांचे अनुदान मिळणार व तिसºया टप्प्यात १ जानेवारी ते ३१ जानेवारीअखेर ज्या शेतकºयांनी कांदा विक्री केला असेल त्यांचे अनुदान येणार असल्याचे जळगाव दुय्यम निबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
अनुदानाची रक्कम ही डीबीटीद्वारे थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, शेतकºयांना कांदा विक्री पट्टी, सातबारा उतारा, बँकेचे बचत खाते, आधार क्रमांक आदी कागदपत्रांसह अर्ज हे कांदा विक्री केलेल्या बाजार समितीकडे सादर करावे लागणार आहेत.
७/१२ वर नोंद नसल्याने फटका
कांदा अनुदान मागणीसाठी सातबारा उताºयावर पीकपाणी नोंदीत कांदा या पिकाचा उल्लेख आवश्यक आहे. उताºयावर कांदा पीक नोंदणी नसेल तर अनुदानास अपात्र ठरविले जाते. त्याचा मात्र शेतकºयांना फटका बसणार आहे.

Web Title: Receive first-stage canada grant in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.