कोविशिल्डचे १६ हजार डोस प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:29+5:302021-05-22T04:15:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्याने शहरातील केवळ तीनच केंद्रांवर शुक्रवारी लसीकरण झाले; मात्र शुक्रवारी दुपारी ...

Received 16,000 doses of Kovishield | कोविशिल्डचे १६ हजार डोस प्राप्त

कोविशिल्डचे १६ हजार डोस प्राप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्याने शहरातील केवळ तीनच केंद्रांवर शुक्रवारी लसीकरण झाले; मात्र शुक्रवारी दुपारी कोविशिल्ड लसीचे १६ हजार डोस प्राप्त झाले आहेत. यातील १२०० डोस हे शहरातील केंद्रांना वाटप करण्यात आले आहेत. सर्वाधिक ११ हजार डोस हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आले आहे.

डोस प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी जि. प. अध्यक्ष रंजना पाटील यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्यानंतर या डोसच्या नियोजनानुसार केंद्रांना वाटप करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग व प्रतिसाद बघता दोन दिवसांपर्यंत हा साठा पुरेल. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत असून, त्यानंतर उपलब्धतेनुसार पहिला डोस असे नियाेजन केंद्रांवर केले जात आहे.

ग्रामीण भागाला प्राधान्य

ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार लसींचे वाटप व्हावे, अशी मागणी नुकतीच स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना लसींचा अधिक पुरवठा केला जात आहे. सम प्रमाणात सर्वत्र लस उपलब्ध होईल, असे नियोजन प्रशासनाकडून केले जात असून, यासाठी अध्यक्ष रंजना पाटील यांनी आरोग्य विभागाकडून याचा आढावा घेतला.

असे झाले वाटप

सर्व आरोग्य केंद्र : ११६००

रेडक्रॉस, राेटरी भवन : ६००

मनपा रुग्णालय : ६००

भुसावळ हॉस्पिटल ४००

ग्रामीण रुग्णालय यावल, पाचोरा, वरणगाव, बद्री रोड भुसावळ प्रत्येकी २००

ग्रामीण रुग्णालय अमळनेर, अमळगाव, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, मेहुणबारे, धरणगाव, एरंडोल, पहूर, पिंपळगाव, पारोळा, पाल, सावदा, न्हावी या ठिकाणी प्रत्येकी १००

उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर, चोपड, अर्बन पीएचसी अमळनेर, भुसावळ प्रत्येकी १००

Web Title: Received 16,000 doses of Kovishield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.