बोदवड येथे कारसेवकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:14 IST2020-08-22T18:14:26+5:302020-08-22T18:14:53+5:30
बोदवड तालुक्यातील २८ कारसेवकांचा येथे सत्कार करण्यात आला.

बोदवड येथे कारसेवकांचा सत्कार
बोदवड, जि.जळगाव : श्रीराम मंदिरासाठी अयोध्येला सन १९९० व १९९२ ला जाणाऱ्या बोदवड तालुक्यातील २८ कारसेवकांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला.
बेटी पढाव बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कांडेलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळेस कारसेवक असलेले अनंतराव कुलकर्णी, नगरसेवक कैलास चौधरी, अनिल खंडेलवाल, मनोहर माळी, डॉ.अजय वैष्णव यांचा सत्कार करण्यात आला. या घटनेतील आठवणींना उजाळाही देण्यात आला.