टेनिस बॉल क्रिकेटला सरकारी नोकरीसाठी आरक्षणात मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:15 AM2021-02-08T04:15:07+5:302021-02-08T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : टेनिस बॉल क्रिकेटपटूंना सुद्धा सरकारी शासकीय सेवेत आता नोकरी मिळू शकणार आहे. शासनाने नोकरीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : टेनिस बॉल क्रिकेटपटूंना सुद्धा सरकारी शासकीय सेवेत आता नोकरी मिळू शकणार आहे. शासनाने नोकरीसाठी या खेळाला आरक्षणात मान्यता दिली आहे. या खेळाडूंची नियुक्ती रोजगार मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय विभागातील गट "क" पदावर केली जाईल .भरतीसाठी तयार केलेल्या क्रीडा कोटाच्या यादीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट ६४ व्या क्रमांकावर जोडले गेले आहे.
हा आदेश केंद्र सरकारच्या कर्मचारी तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या कर्मचारी आणि
प्रशिक्षण विभागाने जारी केले आहे, अशी माहिती राज्य टेनिस बॉल क्रिकेट
संघटनेचे सचिव डॉ. एम बाबर यांनी दिली आहे.
भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
प्रदीप कुमार यांच्यावतीने गत आठवड्यात कार्यालयाचा आदेश जारी करण्यात
आला आहे. क्रीडा विभागाच्या प्रस्तावावर टेनिस बॉल क्रिकेटमधील गुणी
खेळाडूंना शासकीय विभागात गट "क"च्या पदांवर भरती करण्याचे मान्य केले आहे. तसेच या खेळाचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे. भरतीची संबंधित इतर क्रीडाबाबत खेळाडूंच्या नियुक्तीसाठी जे पात्रता आणि निकष लागू असतील
त्याच समान अटी लागू असतील. क्रीडा विभागाने १ सप्टेंबर २०२० रोजी हा
प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला होता.
या खेळाकडे सातत्याने खेळाडूंचा कल वाढत आहे. तसेच लवकरच टेनिस
बॉल क्रिकेटची ही लीग होणार असल्याची माहिती टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अभिनव तिवारी, सचिव इम्रान लारी यांनी दिली.