जळगाव,दि.26- शेती क्षेत्रातही आता नवीन तंत्रज्ञान येऊन खूप बदल होत आहेत. दिवसेंदिवस जमिनीचे क्षेत्र वाटणी पद्धतीमुळे कमी होत चालले आहे. तसेच हवामानातही वारंवार बदल होत आहेत. कमी जागेत अधिक उत्पादन सहज घेता येते, हे शेतक:यांच्या लक्षात येऊ लागले आहे. नियंत्रित शेती (पॉली हाऊस)मध्ये पिकांची गैरमोसमी लागवड करून अधिक नफा मिळविता येतो. त्यामुळे शेतकरी आता नियंत्रित शेतीकडे वळू लागले आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून जांभोरे, ता.धरणगाव येथील अनंत नितीनचंद्र परिहार यांनी कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्याचा हा प्रयोग यशस्वी केला आह़े अनंतने रंगीत ढोबळी मिरची आझादपूर मंडी दिल्ली, मुंबई येथे विक्री केली. त्यास सरासरी 55 रु.किलो दर मिळाला. त्यापासून 11,38,500 इतके उत्पन्न मिळविल़े
ते स्वत: डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर असूनही नोकरीचा विचार न करता शेतीमध्ये प्रगती करण्याचे ठरविले. ठिबक सिंचन पद्धतीवर कापूस पिकाचे एकरी 20.00 क्विंटल उत्पादन त्यांनी मिळविले. कापूस पिकामध्येही प्रगत तंत्राचा अवलंब केला. ह्यावर्षी तूर पीकही ठिबक सिंचनवर लागवड करून फर्टिगेशन तंत्राचा वापर करून विक्रमी उत्पन्न त्यांनी मिळविले आहे. अनंत परिहार यांनी यावर्षी 21 टनार्पयत उत्पादन मिळविले आह़े अजून एका महिन्यात पूर्ण 25 टनार्पयत उत्पन्न जाण्याचा अंदाज आह़े बाजारात मिरची नसल्याने त्यास चांगला दरही मिळण्याची शक्यता आह़े यावर्षी जिवामृताचा वापर केल्यामुळे रासायनिक औषधांचाही खर्च कमी झाला आह़े
अनंतने खासगी कंपनीतून पॉली हाऊसची 20 गुंठे क्षेत्रावर तांत्रिकदृष्टय़ा उभारणी करून घेतली. संपूर्ण उभारणीनंतर त्यामध्ये 3 फूट रुंदीचे गादीवाफे करून घेतले. गादीवाफ्यामध्ये मुरूम, चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, निंबोळी पेंड, रॅली गोल्ड, ट्रायकोडर्माचे मिश्रण भरून घेतले. त्यानंतर ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन यंत्रणा बसवून घेतली. विहिरीवर पाण्यात कचरा, पाला पाचोळा पडू नये, पाण्यात शेवाळ तयार होऊ नये याकरिता 90 टक्के शेडनेट टाकून झाकून घेतली आह़े
व्यवस्थापनातून मिळविले उत्पादऩ़़
पाणी जादा दिले तर पिकांची वाढ खुंटते, बुरशीचे रोग वाढतात, मर रोग वाढतो, अन्नद्रव्ये ङिारपून जातात, त्यामुळे अन्नद्रव्यांच्या उणीवा आढळतात म्हणून ठिबक सिंचनाद्वारे जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच 5 ते 15 मिनिटे ठिबकने पाणी दिले. पिकास पाण्याचा ताण पडू दिला नाही. आठवडय़ात एक वेळा कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. फवारणी करताना कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा पुन्हा पुन्हा वापर होणार नाही, याची काळजी घेतली. काही वेळा ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग केले. फवारणीसोबत काही वेळी संजीवके सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खतांचाही उपयोग केला. रंगीत ढोबळी मिरचीची तोडणी सप्टेंबरअखेर सुरू झाली. नऊ महिन्यांर्पयत रंगीत ढोबळी मिरचीची काढणी सुरू होती. मार्चअखेरला पिकांची काढणी संपली. पिवळ्या रंगाच्या बचाटा जातीच्या ढोबळ्या मिरचीच्या 2600 रोपांपासून 10.200 टन उत्पादन मिळाले. इतक्याच संख्येच्या इन्सपिरेशन जातीची लाल ढोबळ्या मिरचीपासून 10.500 टन उत्पादन मिळाले. असे एकूण 20 गुंठे क्षेत्रामध्ये 20.700 टन उत्पादन रंगीत ढोबळी मिरचीचे मिळाल़े
लागवडीपासूनच घेतली काळजी
गादीवाफे पूर्ण वाफसा अवस्थेत आणून बुरशी नाशकाची फवारणी केली.3 फूट रूंदीच्या गादीवाफ्यांवर 16 मि.मी.च्या दोन इनलाईन नळ्या पसरवून घेतल्या. दोन ड्रिपरमधील अंतर 30 सेमी असून ड्रिपरचा प्रवाह 2.4 लीटर तास आहे. रंगीत ढोबळी मिरचीची रोपे आणली. बचाटा ही पिवळ्या रंगाची तर इन्सपिरेशनही लाल रंगाची ढोबळी मिरचीची जात आहे. रोपे आणल्यानंतर 3-4 दिवसांनी ती 60 बाय 45 से.मी. अंतरावर 4 जुलै 2015 रोजी लागवड केली. 21 दिवसांनी शेंडा खुडून घेतला. त्यानंतर 7 दिवसांनी नायलॉनचे दोरा आधारासाठी रोपांना बांधला. रोपांची चांगली वाढ होण्यासाठी 19 : 19 : 19 या विद्राव्य खतांची फवारणी करून घेतली. लागवडीनंतर 3/4 दिवसांनी फर्टिलायझर टँकमधून फर्टिगेशन सुरू केले. फर्टिगेशन शेवटर्पयत सुरू ठेवले. फर्टिगेशनसाठी ढोबळी मिरचीच्या अवस्थेनुसार 19 : 19 : 19, 12 : 61 : 0, 0 : 52 : 34, 13 : 0 : 45, 0 : 0 : 50 आणि कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग केला़ तसेच विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली. फूल गळ होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्स संजीवकाची फवारणी केली. जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच ठिबकने पाणी दिले. पाणी खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. त्यासाठी तज्ज्ञांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घेतल़े
सव्रेक्षण करून घेतला निर्णय़़़
अनंत परिहार हा तरुण अभियंता इंजिनिअर असल्यामुळे एकदम या व्यवसायामध्ये शिरण्याआधी त्यांनी ब:याच ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पॉली हाऊसमधील विविध पिकांची कार्नेशन्स, गुलाब, जरबेरा, स्ट्रॉबेरी, काकडी, हिरवी ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची या सर्व पिकांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. शेतक:यांसोबत चर्चा केली. तसेच विक्री कोठे, कशी करावी, मार्केट कुठे उपलब्ध आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, औरंगाबाद, इंदूर मार्केटचा अभ्यास केला. मगच त्यांनी शेतीमध्ये नवीन असूनसुद्धा नवीन करण्याचे धाडस केले.
Web Title: Record of colorful gram flour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.