चाळीसगावला गुरांच्या बाजारात विक्रमी पशुधनाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:08 PM2017-09-16T17:08:31+5:302017-09-16T17:17:16+5:30

चाळीसगावच्या गुरांच्या बाजारात आवक होऊनही व्यवहार थंडावले. पशुधनाचे भाव कोसळल्याने मालक फिरले माघारी.

A record number of cattle in the cattle market in Chalisgao | चाळीसगावला गुरांच्या बाजारात विक्रमी पशुधनाची आवक

चाळीसगावला गुरांच्या बाजारात विक्रमी पशुधनाची आवक

Next
ठळक मुद्देगुरांच्या बाजारात विक्रीसाठी बैल दाखल झाल्याने भाव कोसळलेगुजरातकडील म्हशींना खान्देशात मोठी मागणीगायींच्या बाजारातही पशुधनाची आवक चांगली

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव 16 - चाळीसगावच्या गुरांच्या बाजारात दरवर्षी दस:याच्या कालावधीत विक्रमी उलाढाल होत असते. यंदा मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने शनिवार 16 रोजीच्या बैल बाजारावर मंदीचे सावट होते. चारा-पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणात पशुधन विक्रीस आणले होते. मात्र ग्राहक नसल्याने खरेदी-विक्रीचे अत्यल्प व्यवहार झाले.

 चाळीसगाव येथील गुरांच्या बाजारात परजिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात पशुधन विक्रीला येते. यावर्षी पावसाने दडी मारल्याने बाजाराला मंदी आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच पशुधन येथे दाखल झाले. शनिवारी दुपारी 2 र्पयत तुरळक व्यवहार झाले. मात्र बाजारात देखील ग्राहक नसल्याने अनेक पशुपालकांना माघारी परत जावे लागले.

ऊसतोड मजुरांची बाजाराकडे पाठ

चाळीसगाव तालुक्यात 25 हजारावर अधिक ऊसतोड मजूर आहेत. हे मजूर प्रत्येक वर्षी विजयादशमीपूर्वी साखर कारखान्यांच्या मुकादमांकडून उचल मिळाल्यानंतर बैलजोडी खरेदी करतात. यंदा मात्र ऊसतोड मजुरांना पैसे मिळालेले नसल्याने त्यांनी गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरविली.

बैलांचे भाव कोसळले

ग्रामीण भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळसदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संभाव्य चारा व पाणीटंचाई लक्षात घेत शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणात पशुधन विक्रीसाठी काढले आहे. दावणीला बांधलेल्या जनावरांना काय खाऊ घालायचे? अशी चिंता शेतकरी आणि पशुपालकांना आतापासूनच सतावत आहे. त्यामुळे 16 रोजी बाजारात मोठय़ा प्रमाणात पशुधन विक्रीस आले.

विक्रमी आवकमुळे भाव कोसळले

गुरांच्या बाजारात विक्रीसाठी बैल दाखल झाल्याने बाजारात भाव कोसळले आहे. खिलारी जातीचे बैल 45 ते 55 हजार, नागोरी 40 ते 50 हजार, माळवी 35 ते 40 हजार, गावराण 30ते 40 हजार, जर्सी 25 ते 30 हजार अशी बैलजोडींची किंमत होती. काही महिन्यांच्या तुलनेत हे दर 15 ते 20 हजारांनी खाली कोसळले आहे.

म्हशीचे दर तेजीत

गुजरातकडील म्हशींना खान्देशात मोठी मागणी असल्याने या ठिकाणावरून पशुधन विक्रीस आले होते. म्हैस बाजारात भावात तेजी असली तरी येथेही व्यवहार तुरळकच झाले. जाफराबादी 90 हजार ते एक लाख, म्हसान 70 ते 80 हजार, गावराण 50 ते 60 हजार असे म्हशींचे दर होते. गायींच्या बाजारातही पशुधनाची आवक चांगली होती. दिवाळीनंतरच तेजीचे पर्व दस:यापूर्वी बाजारावर मंदीची स्थिती आहे. अपूर्ण पावसाचा पहिला फटका गुरांच्या बाजाराला बसला आहे. दिवाळीनंतरच गुरांच्या बाजारात तेजीचे पर्व येईल, असे व्यापा:यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: A record number of cattle in the cattle market in Chalisgao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.