खडके सूतगिरणीतील कर्मचा:यांचे रेकॉर्डच अपूर्ण

By admin | Published: June 25, 2017 12:37 PM2017-06-25T12:37:07+5:302017-06-25T12:37:07+5:30

संकटांची मालिका : भविष्य निर्वाह निधी मिळण्याची अडचण

The records of the Khadke yarn staff are incomplete | खडके सूतगिरणीतील कर्मचा:यांचे रेकॉर्डच अपूर्ण

खडके सूतगिरणीतील कर्मचा:यांचे रेकॉर्डच अपूर्ण

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.25 : खडके सूतगिरणीतील कामगारांना तीन वर्षाचा भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असतानाच नाशिकच्या भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात मात्र या कर्मचा:यांचे रेकॉर्डच नसल्याची माहिती समोर आल्याने कर्मचा:यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आह़े
दरम्यान, कर्मचा:यांनाच आता स्वत: संगणकावर रेकॉर्ड तयार करून आणण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्यानंतर रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आह़े 28 मार्च 1998 मध्ये खडक्याची सूतगिरणी बंद पडल्याने तब्बल 658 कामगारांवर बेरोजगारीची कु:हाड कोसळली़ कामगारांना एकमेव भविष्य निर्वाह निधीचा आधार असलातरी दरम्यानच्या काळात सूतगिरणीची मशनरी विक्रीची प्रक्रिया तसेच विविध संकटांमुळे कर्मचा:यांना त्यांच्या हक्काच्याच रकमेसाठी कार्यालयाचे उंबरठे ङिाजवण्याची वेळ आली़ नोव्हेंबर 1995 ते सूतगिरणी बंद पडेर्पयतच्या काळातील सुमारे तीन वर्षाची थकीत रक्कम मिळवण्यासाठी कामगारांना संघर्ष करावा लागत आह़े
कामगारांच्या हक्कासाठी लढणा:या शिष्टमंडळाने नुकतीच नाशिक येथील भविष्य   निर्वाह निधी सकार्यालयात जावून संबंधित अधिका:यांशी चर्चा केली़ यावेळी त्यांना या काळातील रेकॉर्डच नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. शिवाय आहे ते रेकॉर्ड जीर्ण झाल्याने शिष्टमंडळानेच संपूर्ण 658 कर्मचा:यांचे संगणकीय रेकॉर्ड तयार करून आणावे तसेच त्याची सीडी आणण्याच्या सूचना करण्यात आल्या़ ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे युनियन प्रतिनिधी भगवान सोनवणे यांनी कळवले आह़े 

Web Title: The records of the Khadke yarn staff are incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.