फिरत्या लोकन्यायालयात १८ लाख ७५ हजार ४३२ ची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:58+5:302021-06-27T04:12:58+5:30
खडकदेवळा, ता. पाचोरा : उच्च न्यायालय, औरंगाबाद विधिसेवा उपसमिती यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथे फिरत्या ...
खडकदेवळा, ता. पाचोरा : उच्च न्यायालय, औरंगाबाद विधिसेवा उपसमिती यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथे फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्धिकी, सहदिवाणी न्यायाधीश एल. वी. श्रीखंडे, प्रभारी गटविकास अधिकारी विलास सनेर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अरुण भोई मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कायदेविषयक शिबिराने झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले. यावेळी शिबिरात जागतिक पर्यावरण या विषयावर चंदनसिंग राजपूत यांनी तसेच बाल कामगार या विषयावर रवींद्र पाटील यांनी ‘महसुली कायदे व योगा’ या विषयावर स्वप्नील पाटील तसेच वरिष्ठ नागरिक कायदा या विषयावर अनिल पाटील तर बालकांचे हक्क मोफत शिक्षण कायदा, बालकांचे पोषण सुरक्षा कायदा याविषयी सहदिवाणी न्यायाधीश श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना एफ. के. सिद्दिकी यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विधी सेवा योजना यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी तर सूत्रसंचालन कैलास सोनवणे यांनी केले. या फिरते लोकन्यायालयात एकूण ३३ केसेस निकाली होऊन एकूण रक्कम १८ लाख ७५ हजार ४३२ रुपयांची वसुली झाली. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी विधी सेवेचे बी. एम. भोसले, डी. के. तायडे, अनिल गोंधने, होतीलाल पाटील, मुकेश पाटील, स्वप्नील पाटील, नितीन कदम तसेच पाचोरा पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा, खडकदेवळा खु. येथील कर्मचारी, ग्रामसेवक राजेंद्र पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले.