चार तालुक्यांची रिकव्हरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:14+5:302021-05-07T04:17:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून नवे रुग्ण कमी व बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक अशी दिलासादायक ...

Recovery of four talukas is more than 90 percent | चार तालुक्यांची रिकव्हरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक

चार तालुक्यांची रिकव्हरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून नवे रुग्ण कमी व बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक अशी दिलासादायक स्थिती असल्याने जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे. जवळपास सर्वच तालुक्यात स्थिती सुधारत असून आता ४ तालुक्यांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्कयांपेक्षा अधिक झाले आहे. शिवाय जळगाव शहर व भुसावळ वगळता अन्य सर्व ठिकाणी ८०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

मे महिन्याची सुरूवात एप्रिलच्या तुलनेत दिलासादायक झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून रुग्णसंख्या ही १ हजारांच्या खालीच नोंदविण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे बुधवारी चाचण्यांची संख्या वाढल्यानंतरही ही संख्या ९९९ पर्यंत स्थिर होती. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे हे संकेत आहेत. मात्र, नागरिकांनी निर्बंधांमध्ये कुठेही शिथीलता न आणता नियमांचे काटेकोर पालन करावे, तेव्हाच कोरोनावर मात करणे शक्य होणार असल्याचा संदेश प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे.

ॲक्टिव्ह केसेस घटल्या

जिल्ह्यातील ॲक्टिव्ह केसेस या १२ हजारांवर पोहोचल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन बेड मॅनेजमेंट कोलमडले होते. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून ही स्थिती सुधारत असून आता जवळपास सर्वच यंत्रणेत बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी फरफट थांबली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून ९ हजार ७१२ वर पोहोचली आहे. त्यातच ऑक्सिजनची मागणीही घटत असल्याचे एक दिलासादायक चित्र समोर येत आहे.

ऑक्सिजनवरील रुग्ण घटले

ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या ही १६०० वर पोहोचली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रुग्णांमध्येही घट होत असून ही संख्या आता १२२७ वर पोहोचली आहे.

ॲक्टिव्ह केसेसे ५०० पेक्षा अधिक

जळगाव : १९९६

भुसावळ १०९८

अमळनेर ७६३

जामनेर ७००

चाळीसगाव ६८९

एरंडोल ६६५

रावेर ६६०

पाचोरा ५६३

चोपडा ५५३

मुक्ताईनगर ५०५

रिकव्हरी रेट

चोपडा ९४ टक्के

पारोळा ९३ टक्के

भडगाव ९३ टक्के

जळगाव ९२ टक्के

Web Title: Recovery of four talukas is more than 90 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.